जयस्तंभ चौकात उभारणार बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:32 AM2021-03-24T04:32:22+5:302021-03-24T04:32:22+5:30

बुलडाणा शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळाही असावा, यासाठी २३ डिसेंबर २०२० रोजी जिल्हा प्रशासन व आ. संजय गायकवाड ...

A statue of Babasaheb Ambedkar will be erected at Jayasthambh Chowk | जयस्तंभ चौकात उभारणार बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा

जयस्तंभ चौकात उभारणार बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा

Next

बुलडाणा शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळाही असावा, यासाठी २३ डिसेंबर २०२० रोजी जिल्हा प्रशासन व आ. संजय गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. यापूर्वी जयस्तंभ चौकात असलेल्या व नंतर काढून टाकण्यात आलेल्या शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या जागेवरच बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यात यावा, यासाठी विविध संघटना व समाज बांधवांनी मागणी केली होती. त्यानुसार सोमवारी आ. संजय गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयात समाजातील विविध मान्यवरांची बैठक होऊन या बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती गठित करण्यात आली. त्यानुसार या समितीचे अध्यक्ष म्हणून सर्वानुमते जि.प.चे गटनेते ॲड. सुमित साहेबराव सरदार, तर कार्याध्यक्ष म्हणून जि.प.चे माजी अर्थ व बांधकाम सभापती दिलीपराव जाधव यांची निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष प्रा. दादाराव गायकवाड, दिलीप दौलत जाधव, अनिल आराख, सचिव म्हणून जि.प.चे माजी विरोधी पक्षनेते अशोकराव इंगळे, सहसचिव ॲड. गणेश इंगळे, राहुल रामकृष्ण सुरडकर, कोषाध्यक्ष सिद्धार्थ आराख, संघटक प्रा. एस. पी. हिवाळे, सुमीत गायकवाड, सतीश पवार, सहसंघटक निरंजन जाधव, शाहिर डी.आर. इंगळे, कार्यकारिणी सदस्य म्हणून पुंजाजी मेंढे, सावजी जाधव, लक्ष्मण साळवे, संजय तोताराम जाधव, गजानन ससाने, दीपक मनवर, ॲड. अशोक गवई, अनिल किसन साळवे तर प्रसिद्धी प्रमुख म्हणून संजय जाधव, नितीन शिरसाठ यांची निवड करण्यात आली. या स्मारक समितीचे मार्गदर्शक म्हणून आ. संजय गायकवाड राहणार आहेत. नवनियुक्त कार्यकारिणीची लवकरच बैठक होऊन ही कार्यकारिणी आजीवन सदस्यांची निवड करणार आहे. लवकरच समितीचे सदस्य पुणे येथे जावून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची पाहणी करून पुतळा निश्चित करणार आहेत.

Web Title: A statue of Babasaheb Ambedkar will be erected at Jayasthambh Chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.