पुतळे, स्मारके असुरक्षित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 11:11 PM2017-08-13T23:11:42+5:302017-08-13T23:13:22+5:30
चिखली : माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते अनावरण झाल्याने विशेष महत्त्व प्राप्त तसेच संपूर्णपणे ‘ब्रान्झ’ धातूने बनविलेल्या स्थानिक डी.पी. रोडस्थित हिंदूसूर्य महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळय़ाची विटंबना झाल्यानंतर या घटनेचा समाजातील सर्व स्तरातून निषेध होत असून, या घटनेने शहरातील स्मारके व पु तळय़ांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सुधीर चेके पाटील।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते अनावरण झाल्याने विशेष महत्त्व प्राप्त तसेच संपूर्णपणे ‘ब्रान्झ’ धातूने बनविलेल्या स्थानिक डी.पी. रोडस्थित हिंदूसूर्य महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळय़ाची विटंबना झाल्यानंतर या घटनेचा समाजातील सर्व स्तरातून निषेध होत असून, या घटनेने शहरातील स्मारके व पु तळय़ांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तथापि, शहरात कायदा व सुव्यस्था अबाधित राहून शांतता भंग होऊ नये, यासाठी पु तळय़ांना तातडीने सुरक्षा व्यवस्था पुरवावी, अशी मागणी यानिमित्ताने समोर आली आहे.
युगपुरुष, हुतात्मे, राष्ट्रपुरुष महान व्यक्तिमत्त्व यांचा आदर्श लोकांनी घ्यावा, त्यांच्यापासून प्रेरणा मिळावी, त्यांचा इतिहास हा नवीन िपढीला माहीत व्हावा, हा सर्वसाधारण उद्देश महापुरुषांच्या पुतळा व स्मारके उभारणीमागे असतो. त्यामुळे प्रत्येक शहरात, गावागावांत युगपुरुष, हुतात्मे व सन्माननीय व्यक्तींचे पुतळे उभारण्यात आले आहे त; मात्र पुतळय़ांच्या उभारणीनंतर महापुरुषांना जातीच्या, विचारांच्या आधारे वाटण्याची चढाओढ समाजात सुरू असल्यानेच पुतळय़ांच्या विटंबनेच्या घटनांवरून दंगलीचे प्रकार घडत असतात. सुदैवाने चि खलीत घडलेला प्रकार हा त्यातला नव्हता आणि शांतताप्रिय व सामाजिक सलोख्याच्या बाबतीत कायम संवेदनशील असलेल्या चिखली शहरात हिंदूसूर्य महाराणा प्रताप यांच्या पुतळय़ाच्या विटंबने पश्चात विशेषत: राजपूत बांधवांनी आपला संयम ढळू न दिल्याने शहराची शांतता अबाधित राहिली असली, तरी या घटनेने शहरातील सर्वच महापुरुषांचे पुतळे व स्मारकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला. पालिकेच्या सर्वेक्षणानुसार चिखली शहरात आज रोजी महा पुरुषांचे एकूण १६ पुतळे आहेत. यामध्ये महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज, त थागत गौतम बुद्ध, राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब, हिंदूसूर्य महाराणा प्रता प, वासुदेव बळवंत फडके यांचे प्रत्येकी एक तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतिबा फुले यांची प्रत्येकी दोन असे एकूण १२ पुतळे अस्तित्वात आहेत. शहरातील हे सर्व पुतळे नगरपालिकेच्या अखत्यारीत आहेत. ज्या महापुरुषांच्या त्यागाने भारत वर्षाचा इतिहास झळाळला, त्यांच्या पुतळ्यांच्या स्वच्छतेबरोबरच सुरक्षिततेचा प्रश्नही आजघडीला निर्माण झाला असून, पुतळ्यांभोवती असलेले घाणीचे साम्राज्य, अस्वच्छता, पुतळ्यांसाठी असलेल्या संरक्षक कठड्याला लावण्यात येणारे बॅनर अशा अनेक कारणांनी काही पुतळे बंदिस्त असून, शहरातील सर्वच पुतळ्यांची अवस्था सारखीच आहे. पु तळ्यांना कुठेही संरक्षण नाही, अनेक पुतळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी पायर्या नाहीत. अनेक महापुरुषांच्या पुतळा परिसराची अत्यंत दयनीय अवस्था असून, पुतळा परिसराचे सुशोभीकरण करणे, नियमित साफसफाई करणे, पुतळ्यासह चबुतर्याची योग्य निगा रा खणे आवश्यक आहे. उभारलेल्या पुतळ्यांवरून राजकीय व आ िर्थक फायदा उठविण्याचा धंदा सध्या तेजीत असताना पालिका प्रशासन मात्र याकडे सोयीस्करपणे डोळेझाक करताना दिसून येते. पु तळ्यांना कुठेही सरंक्षण न दिल्या गेल्याने त्यांच्या विटंबनेच्या अप्रिय घटना यापूर्वीही घडलेल्या आहेत. महाराणा प्रताप पुतळा विटंबनाची घटनाही केवळ सुरक्षिततेच्या अभावाने घडली आहे. ही घटना एका मद्यपीकडून नशेत घडली असल्याचे निष्पन्न झाले आहे. वस्तुत: ही बाब निष्पन्न होण्यापूर्वी जनक्षोभ उसळला असता, तर त्यास आवर घालणे कठीण झाले असते; मात्र सर्वच महाराणाप्रेमी जनतेने मोठा संयम बाळगला. पोलिसांना तपासासाठी वेळ देऊन शहराची शांतता अबाधित राखण्यात मोलाची मदत झाली आहे. यापासून बोध घेत पालिकेने तातडीने सर्व पुतळे व स्मारकांना सुरक्षा व्यवस्था पुरविणे गरजेचे झाले आहे.
सणवार, जयंती-पुण्यतिथी तसेच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास पुतळ्यांना आम्ही संरक्षण देत असतो; मात्र इतर वेळी पु तळ्यांना संरक्षण देणे, ही जबाबदारी पुतळा स्थापनार्या समितीने पालिकेला हस्तांतरित केली असल्यास ती जबाबदारी नगर परिषदेची असते. सामाजिक स्वास्थ्य बिघडू नये व शांतता अबाधित राहावी, यासाठी पालिकेने आपली जबाबदारी ओळखून पुतळ्यांना योग्य ते संरक्षण पुरवावे.
-महेंद्र देशमुख, ठाणेदार, चिखली.