योग करून निरोगी रहा : महाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:23 AM2021-06-23T04:23:06+5:302021-06-23T04:23:06+5:30
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने चिखली येथे भारतीय जनता पक्ष, आर्ट ऑफ लिव्हिंग व पतंजली योग पीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ...
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने चिखली येथे भारतीय जनता पक्ष, आर्ट ऑफ लिव्हिंग व पतंजली योग पीठ यांच्या संयुक्त विद्यमाने योग प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. या योग शिबिराला योग गुरू सुनील भोजवानी यांनी मार्गदर्शन केले. येथील गुरुनानक मंगल कार्यालयात झालेल्या योग शिबिराची सांगता आ. महाले यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रतापसिंग राजपूत, संजय चेके पाटील, रामकृष्ण शेटे, पंडितराव देशमुख, प्रेमराज भाला, रामदास देव्हडे, सुधीर तांबट, अजय कोठारी, नगरसेविका अर्चना खबुतरे, सुदर्शन खरात, गोविंद देव्हडे, अनुप महाजन, नामू गुरुदासानी, प्रा. वीरेंद्र वानखेडे, हरिभाऊ परिहार, युवराज भुसारी, प्रभाकर भोजवानी, वसंत भोजवानी, सनी भोजवानी, रमण भोजवानी, विजय खरे, निरज लढ्ढा, नारायण भवर, कीर्ती वायकोस, नाना खेडेकर, आनंदराव हिवाळे, सुरेश बाहेकर यांची उपस्थिती होती.
कोलारा येथे योग शिबिर
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त तालुका भाजपाच्यावतीने श्री सिद्धेश्वर महाराज संस्थान कोलारा येथे योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात योग शिक्षक डहाके यांनी उपस्थितांना योगाचे प्रशिक्षण दिले. आयोजन तालुकाध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ यांनी केले होते. यावेळी साहेबराव पाटील सोळंकी, डॉ. दामोदर भवर, नामदेवराव सपकाळ, रामेश्वर सोळंकी, भगवानराव सोळंकी, किसनराव सोळंकी, धोंडू सोळंकी, उद्धव पवार, ज्ञानेश्वर सपकाळ, निवृत्ती सोळंकी आदी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.