सर्वांगीण विकासासाठी एक पाऊल पुढेच राहु- रियाजखान पठाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:35 AM2021-04-04T04:35:56+5:302021-04-04T04:35:56+5:30
ते विविध विकासकामाच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. यावेळी रा.काँ. जिल्हा युवक कार्याध्यक्ष समाधान शिंगणे, सरपंचपती रामकिसन म्हस्के, उपसरपंच सय्यद ...
ते विविध विकासकामाच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. यावेळी रा.काँ. जिल्हा युवक कार्याध्यक्ष समाधान शिंगणे, सरपंचपती रामकिसन म्हस्के, उपसरपंच सय्यद सईद, राष्ट्रवादी जिल्हा कार्यकारणी सचिव सुभाष शिंगणे, ग्रा.पं.सदस्य वासुदेव पाटील शिंगणे, गजानन खरात, अंनता इंगळे, शेख मुस्लिम, मोहम्मद आशिक, संदीप राऊत, उमेश शिंगणे, धर्मा खिल्लारे, रामभाऊ गुरुजी शिंगणे, रवींद्र इंगळे, सुभाष शिंगणे, संतोष शिंगणे, भगवान शिंगणे, अभिजीत शिंगणे, शेख रफीक, अकील कुरेशी उपस्थित होते. राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या मार्गदर्शनात देऊळगावमही शहरासह ग्रामीण भागातील अंढेरा, नारायणखेड, निमगावगुरु, सांवगी टेकाळे, सिनगाव जहागीर, मेहुणाराजा, डोड्रा, मंडपगाव, बायगाव बु, मेंढगाव, सरंबा, पिंपरी आंधळे या गावांसह वाडी-वस्त्यांमधील अंगणवाडी, शाळा, काँक्रीट रस्ते, नालीकाम बांधकाम, सभामंडप यासह नागरिकांच्या सर्व मूलभूत सुविधांचे विकासकामे पूर्ण करणार असल्याची ग्वाही कुरेशी यांनी दिली. याप्रसंगी इम्रान बागवान, शेख अनिस, लक्ष्मण शिंदे, हरिदास शिंदे, आलिम मिर्झा, शेख अमान व ग्रामस्थ उपस्थित होते. (वा.प्र.)