धक्कादायक! सावत्र आईनं चिमुकल्याला तापलेल्या तव्यावर उभं केलं; गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2020 10:29 PM2020-12-26T22:29:12+5:302020-12-27T12:23:41+5:30

Buldhana News मुलाच्या तळपायाला जखमा; जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू

stepmother kept her son stands on the hot tawa | धक्कादायक! सावत्र आईनं चिमुकल्याला तापलेल्या तव्यावर उभं केलं; गुन्हा दाखल

धक्कादायक! सावत्र आईनं चिमुकल्याला तापलेल्या तव्यावर उभं केलं; गुन्हा दाखल

Next


मोताळा: बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील अवघ्या आठ वर्षाच्या चिमुकल्याला सावत्र आईने तप्त तव्यावर उभे केल्याने हा चिमुकला जखमी झाला असून त्याच्यावर सध्या बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. या प्रकरणी पीडित मुलाच्या मामाने बोराखेडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून त्यावरून पोलिसांनी सावत्र आई विरोधात गुन्हा दाखल केला आहे.पीडित चिमुकल्याचे मामा वैभव मनोहर मानकर (१९ रा. जयपूर लांडे, खामगाव) यांनी बोराखेडी पोलिस ठाण्यात २६ डिसेंबर रोजी तक्रार दिली आहे. त्यावरून बोराखेडी पोलिसांनी सायंकाळी गु्न्हा दाखल केला आहे. तक्रारीत नमुद केले आहे की, घरामध्ये खेळत असताना पीडित आठ वर्षाच्या मुलाचा लोखंडी कपाटाला धक्का लागल्याने ते कपाट त्याच्या छोट्या बहिणीच्या अंगावर पडता पडता राहिले. ती पीडित मुलाच्या सावत्र आईने रोखली होती. ही घटना १५ डिसेंबर २०२० रोजी सकाळी सात ते साडेसात वाजेच्या सुमारास घडली होती. त्यावेळी पीडित मुलास त्याची सावत्र आई शारदा सचीन शिंगोटे हीने गरम तव्यावर उभे केेल होते. त्यामुळे आठ वर्षाच्या मुलाचे तळपाय भाजून जखमा झाल्या होत्या. ही बाब पीडित मुलाने वैभवला सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे. दरम्यान चिमुकला जखमी झाल्यानंतर त्याच्यावर प्रथम खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. तेथून त्याला अकोला येथे उपचारासाठी नेण्यात आले होते. या प्रकरणात पोलिसांनी वैभव मानकर यांच्या तक्रारीवरून पीडित मुलाची आई शारदा सचीन शिंगोटे यांच्या विरोधात विविध कलमांसह बालन्याय मुलाची काळजी व संरक्षण अधिनियम २०१५ च्या अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक माधवराव गरूड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनिल भुसारी हे करीत आहे.

बाल कल्याण समितीने नोंदवला बयाण

बुलडाणा येथील बाल कल्याण समितीनेही शुक्रवारी या मुलाचा बयाण नोंदविला असल्याची माहिती बाल कल्याण समितीच्या सदस्य ॲड. किरण राठोड यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. समितीने मुलाच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने त्याचा बयाण नोंदविला आहे तर पोलिसांनीही प्रकरणात गुन्हा दाखल करण्याच्या दृष्टीने शुक्रवारीच बयाण नोंदवले होते. दरम्यान याप्रकरणात आता मुलाचा मामा पुढे आला आहे. मुलाची आजी व त्याच्या मामाने मुलाच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारल्यास अल्पवयीन मुलाला त्यांच्या ताब्यात समिती देवू शकते असेही ॲड. किरण राठोड यांनी सांगितले.


जिल्हा शल्यचिकित्सकांना पत्र
सध्या या मुलावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत असून या पीडित मुलास त्याच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात येवू नये असे पत्रच बालकल्याण समितीने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांना यदिले आहे. त्यामुळे सध्या हा मुलगा बाल कल्याण समितीच्या ताब्यात आहे.

Web Title: stepmother kept her son stands on the hot tawa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.