राताळी येथील कोरोना संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी प्रशासनाने उचलले पाऊल - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:35 AM2021-04-07T04:35:10+5:302021-04-07T04:35:10+5:30
राताळी गावात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून येत असल्याने ग्रामस्थांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु, शासनाच्या नियमांचे ...
राताळी गावात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून येत असल्याने ग्रामस्थांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु, शासनाच्या नियमांचे पालन होत नसल्याची बाब ग्रामसेवक, तलाठी यांच्या निदर्शनास आली. मंडळाधिकारी राजेंद्र आव्हळे, तलाठी मांडगे, ग्रामसेवक रतिलाल पंढरे, अंगणवाडीसेविका ऊर्मिला नरवाडे, मंदाबाई सोभागे, ग्रामपंचायत सदस्य दीपक गव्हाड, ज्ञानेश्वर सरकटे, खुशाल पाटील, भानुदास पाटील, राजू खिल्लारे, परमेश्वर गवई यांंच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी अर्जुन जाधव, अच्युतराव पाटील, समाधान जाधव, सुनील पाटील, वसंत सरकटे, भानुदास लव्हाळे हजर होते. बैठकीत आव्हाळे यांनी गावातील लोकांनी कोरोना लस लवकरात लवकर घ्यावी, तपासणी वेळेवर करून घ्यावी, अंतर ठेवून बोला, मास्क वापरा, जास्त गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, लग्न मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लावा, बाहेरून आल्यावर लगेचच हात स्वच्छ धुऊन घ्या, ताप-सर्दी असल्यास अंगावर काढू नका, असे आवाहन केले. साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कोरोना प्रतिबंधक लसीचे लसीकरण सुरू आहे. तरी गावातील जास्तीतजास्त ग्रामस्थांनी लसीकरण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
फोटो :-- बैठकीत मार्गदर्शन करताना मंडळाधिकारी राजेंद्र आव्हाळे.