लोणार सरोवर विकासासाठी पडलेली पावले थबकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:32 AM2020-12-31T04:32:50+5:302020-12-31T04:32:50+5:30
टी-१ सी-१ वर्षभर चर्चेत टी-१ सी-१ वाघ हा वर्षभर चर्चेत राहिला. कोरोनामुळे त्याला मेटिंगसाठी वाघीणही मिळाली नाही. व्याघ्र संवर्धनाच्या ...
टी-१ सी-१ वर्षभर चर्चेत
टी-१ सी-१ वाघ हा वर्षभर चर्चेत राहिला. कोरोनामुळे त्याला मेटिंगसाठी वाघीणही मिळाली नाही. व्याघ्र संवर्धनाच्या दृष्टीने ज्ञानगंगा अभयारण्याचा अभ्यास करण्यासाठी पाच सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली. खासदार प्रतापराव जाधव यांनी दोनदा वन विभागाच्या वरिष्ठ अधिकारी तथा मुख्यमंत्र्यांना यासंदर्भाने पत्र पाठवले. सध्या टी -१ सी -१ ज्ञानगंगातच स्थिरावरला आहे. टी -१ सी -१ मुळे वन ग्राम देव्हारीच्या पुनर्वसनाला चालना मिळाली. त्यासाठी ‘कॅम्पा’कडे ५७ कोटी सात लाखांचा निधी मागण्यात आला. मात्र, कोरोना संसर्गामुळे हा निधी मिळू शकला नाही.
अस्वल हल्ला, दोन आदिवासींचा मृत्यू
संग्रामपूर तालुक्यातील निमखेड येथील दोन आदिवासींचा अंबाबरवा अभयारण्यात अस्वलाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. विशेष म्हणजे याच भागात अस्वलाचे पिल्लूही मृतावस्थेत आढळून आले होते. जून महिन्यात ही घटना समोर आली होती.