Sting Operation : मापात ‘पाप’ करून शेतकऱ्यांची फसवणूक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 02:27 PM2019-12-30T14:27:31+5:302019-12-30T14:27:42+5:30
कापसाने भरलेले वाहन खरेदी केंद्रावर नेल्यानंतर त्या ठिकाणी प्रति वाहन १ ते दीड क्विंटल कापसाची चोरी होत असल्याचे दिसून येते.
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: येथे ‘सीसीआय’च्या कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची खुलेआम लूट सुरू आहे. मापात पाप करून कापसाची चोरी करण्याचाच हा प्रकार असून यामुळे शेतकºयांना प्रतिवाहन ५ ते ६ हजार रूपयांपर्यत नुकसान सहन करावे लागत असल्याचा प्रकार ‘लोकमत स्टींग’ आपॅरेशनमध्ये उघडकीस आला आहे.
किमान आधारभूत दराने खामगावात सीसीआयकडून कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. खामगावात ६ ठिकाणी शेतकºयांचा कापूस खरेदी केल्या जात आहे. यापैकी एमआयडीसी भागात ३ आणि तलाव रोड भागात ३ ठिकाणी गोडाऊन भाड्याने घेण्यात आले आहेत. कापसाचे किमान आधारभूत दर प्रतिक्विंटल ५५०० रूपये आहेत. असे असले तरी मालातील आर्द्रता बघून भाव देण्यात येत आहेत. गत काही दिवसांपासून खरेदी करण्यात आलेल्या कापसाला ५ हजार २३५ ते ५४५० रूपये प्रतिक्विंटल एवढा भाव शेतकºयांना देण्यात येत असल्याचे दिसून येते. दरम्यान सीसीआयच्या या कापूस खरेदी केंद्रांवर शेतकºयांची मोठ्या प्रमाणावर लूट सुरू आहे. शेतकºयाने कापसाने भरलेले वाहन खरेदी केंद्रावर नेल्यानंतर त्या ठिकाणी प्रति वाहन १ ते दीड क्विंटल कापसाची चोरी होत असल्याचे दिसून येते. उताºयाच्या नावाखालीसुध्दा प्रति वाहन २ ते ५ किलो कापूस काढण्यात येतो. विशेष म्हणजे या कापूस खरेदी केंद्रांवर सीसीआयच्या अधिकाºयांपेक्षा खासगी व्यापाºयांचीच जास्त चलती असल्याचे दिसते. व्यापारी सांगतील त्या वाहनाचे मोजमाप लवकर होते. इतर वाहनांचे मोजमाप होण्यास उशीर लागतो. विशेष म्हणजे वाहनाचे मोजमाप झाल्यानंतर वाहनातून कापूस खाली करतानाही दुजाभावाची वागणूक मिळते. व्यापाºयांच्या जवळच्या व्यक्तीची कापसाची ट्रॉली असेल तर त्याला हॉयड्रॉलीकने कापूस खाली करण्याची परवानगी मिळते. इतर शेतकºयांना मजूर लावून कापूस खाली करावा लागतो. मजुरांकडून कापूस खाली करण्यासाठी १५ रूपये प्रतिक्विंटल याप्रमाणे मजुरी अदा करावी लागते. याशिवाय १० रूपये प्रतिक्विंटनुसार दलाली वेगळीच. एकंदरीत सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रांवर दुजाभावाची वागणूक मिळते. यामुळे शेतकरी त्रस्त झाले असून याकडे वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष द्यावे व शेतकºयांची लूट थांबवावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
असे केले स्टींग!
सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावर शेतकºयांची फसवणूक सुरू आहे, अशी माहिती ‘लोकमत’ प्रतिनिधीला मिळाली. यानंतर प्रतिनिधीने प्रत्यक्ष कापूस खरेदी केंद्रार जाऊन पाहणी केली असता, हा सर्व प्रकार समोर आला. प्रति वाहन १ ते दीड क्विंटलची हेराफेरी, उताºयाच्या नावाखाली २ ते ५ किलो कापसाची मागणी तसेच वाहन खाली करताना होणारा दुजाभाव असे सगळे प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे काही शेतकºयांनी उताºयासाठी कापूस देण्यास विरोधही केला. परंतु त्यांचा कोणी वाली नसल्याचे दिसून आले.
अशी होते कापसाची चोरी!
वाहनाचे मोजमाप करताना आधी कापसासह वाहन काट्यावर उभे करण्यात येते. याची नोंद घेऊन वाहन कापूस खाली करण्यासाठी नेण्यात येते. त्यानंतर रिकाम्या वाहनाचे मोजमाप करत असताना त्या वाहनासोबत एक व्यक्ती तसेच काही वजन मापे काट्यावर ठेवण्यात येतात. यामुळे रिकाम्या वाहनाचे वजन साधारणपणे ६० ते ७० किलोने वाढविले जाते.
काट्यावर उभे राहून वजन वाढविण्याचा प्रकार गंभीर आहे. सीसीआयचे अस्थायी कर्मचारी दोषी असतील तर चौकशी करून त्यांच्यावरकारवाई केली जाईल. उताºयाबाबत शनिवारी तक्रार प्राप्त झाली आहे.
-सतीश देशमुख
व्यवस्थापक, सीसीआय, खामगाव.