Sting Operation :पाच दिवस उलटल्यानंतरही निरिक्षक परतले नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 01:42 PM2019-04-02T13:42:21+5:302019-04-02T13:42:49+5:30
सोमवारी म्हणजेच आठवड्याच्या पहिल्याच दिवशी देखील दुपारपर्यंत वजने मापे कार्यालय बंद असल्याचे ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये दिसून आले.
- अनिल गवई
खामगाव : स्थानिक वजने मापे कार्यालयाचा कारभार वारंवार चव्हाट्यावर येत असतानाच, बुधवारी तपासणीसाठी गेलेले निरिक्षक तब्बल पाच दिवसांपासून कार्यालयात पोहोचले नाहीत. त्यामुळे लागोपाठ पाच दिवस या कार्यालयाला कुलूप होते. सोमवारी म्हणजेच आठवड्याच्या पहिल्याच दिवशी देखील दुपारपर्यंत वजने मापे कार्यालय बंद असल्याचे ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये दिसून आले.
स्थानिक प्रशासकीय इमारतीत निरिक्षक वैध मापन शास्त्र (वजने मापे) कार्यालय आहे. मात्र, अधिकाºयांच्या दुर्लक्षामुळे हे कार्यालय नेहमीच वाºयावर असल्याचे दिसून येते. मार्च महिन्याच्या दुसºया आठवड्यात लागोपाठ तीन दिवस या कार्यालयाला कुलूप होते. त्यानंतर २७ मार्च ते ०१ एप्रिलच्या कालावधीत देखील या कार्यालयाला कार्यालयीन वेळेत कुलूप दिसून आले. २७ एप्रिल रोजी तपासणी कामासाठी गेलेले निरिक्षक सोमवारी तब्बल पाच दिवसांपर्यंत पोहोचले नसल्याची चर्चा प्रशासकीय इमारतीत होत आहे. दरम्यान, निरिक्षक हे अकोला येथून नियमित ये-जा करीत असल्याने, कार्यालयातील कर्मचाºयांचे चांगलेच फावत असल्याचे दिसून येते. निरिक्षक तपासणी कामासाठी बाहेर आणि कार्यालयीन कर्मचारी अघोषित सुटीवर आणि कार्यालयाला कुलूप असेच चित्र या कार्यालयाचे नित्याचे झाल्याचे दिसून येते.
‘लोकमत’मुळे उघडले कुलूप!
- २६ मार्च रोजी या कार्यालयाला कुलूप होते. त्यानंतर २७ मार्च रोजी देखील सकाळी ११$$:४५ वाजता हे कार्यालय कुलूप बंद होते. २८ मार्च रोजी देखील हा प्रकार कायम होता. दरम्यान, ‘कार्यालय बंद’ असल्याचे स्टिंग आॅपरेशन करण्यात आल्याचे समजताच २८ मार्च रोजी काही काळासाठी हे कार्यालय तात्पुरते उघडण्यात आले आणि ‘निरिक्षक, तपासणी कामासाठी एमआयडीसी’मध्ये गेल्याची चिठ्ठी चिटकविण्यात आली.
असे करण्यात आले स्टिंग आॅपरेशन!
- वजने मापे कार्यालय सतत कुलूप बंद राहत असल्याने, या कार्यालयाशी निगडीत असलेल्यांच्या तक्रारीवरून सोमवार २५ मार्चपासून या कार्यालयाची नियमित पाहणी करण्यात आली. यामध्ये २५ मार्च रोजी दुपारी ३:३० वाजता कार्यालयीन वेळेत कार्यालय बंद होते. २६ मार्च रोजी देखील सकाळी हे कार्यालय बंद होते. त्यानंतर २७ मार्च रोजी देखील नित्याचाच प्रकार कायम होता. २८ मार्च रोजी कार्यालय उघडून फलक लावण्यात आले. त्यानंतर शनिवारी सकाळी आणि सोमवारी सकाळी देखील या कार्यालयाला कुलूप असल्याचे दिसून आले.
- नियमित तपासणीसाठी आपणास नियमित बाहेर जावे लागते. २७ मार्च रोजी एमआयडीसीत तपासणी कामासाठी गेलो होतो. सातत्याने कार्यालय बंद असल्याची माहिती घेतली जाईल.
-पी.पी. शेरेकर, निरिक्षक, वजने मापे, खामगाव.