जिल्ह्यातील रेमडेसिविरचा काळाबाजार थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:35 AM2021-04-20T04:35:52+5:302021-04-20T04:35:52+5:30
बुलडाणा जिल्ह्यात वाढता कोरोनाचा आलेख बघता आरोग्य विभागामध्ये नियोजनाचा अभाव दिसत आहे. शासन टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रीटमेंटवर भर देत असताना ...
बुलडाणा जिल्ह्यात वाढता कोरोनाचा आलेख बघता आरोग्य विभागामध्ये नियोजनाचा अभाव दिसत आहे. शासन टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रीटमेंटवर भर देत असताना आपल्या जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल तब्बल आठ दिवस मिळत नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. आठ दिवस जर त्या रुग्णाचा अहवाल मिळत नसेल तर त्या रुग्णाला उपचार मिळत नाही. त्याची प्रकृती ही चिंताजनक होते, नंतर त्या रुग्णाला रेमडेसिविरची अवशक्ता भासते. असे असताना जर त्या रुग्णाला वेळेवर रेमडेसिविर मिळाले नाही तर त्याचा जीवसुद्धा जाऊ शकतो, अशा परिस्थितीत बुलडाणा जिल्ह्यात रेमडेसिविर असूनसुद्धा त्याचा उपयोग होत नाही. रुग्णांच्या नातेवाईकांना वेठीस धरून रेमडेसिविर हे इंजेक्शन किंमत जर १५०० रुपये असेल, तर हेच इंजेक्शन ६,००० ते ७,००० रुपयाला विकतात. रेमडेसिविर तात्काळ पाहीजे असेल तर आपले स्वीय सहायक ठरवतात की, रेमडेसिविर द्यायचे की नाही किंवा अन्न व औषध प्रशासन विभागाच्या घिरके यांचा नंबर दिला जातो, असा आरोपही वंचित बहुजन आघाडीच्यावतीने करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार तात्काळ थांबवावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष नीलेश जाधव यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.