काँग्रेसचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 12:44 AM2017-10-24T00:44:07+5:302017-10-24T00:44:30+5:30

मलकापूर: राष्ट्रीय महामार्ग क्र.६ ची झालेली दयनीय अवस्था व  ठिकठिकाणी पडलेल्या खड्डय़ांमुळे अपघात हे नित्याचेच झाले  आहेत. महामार्गाच्या  तत्काळ दुरुस्तीच्या मागणीसाठी २३ ऑ क्टोबर रोजी तालुका व शहर काँग्रेसच्यावतीने धानोरा  महामार्गावरच रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी  दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

Stop the Congress way | काँग्रेसचा रास्ता रोको

काँग्रेसचा रास्ता रोको

Next
ठळक मुद्देमहामार्गाच्या तत्काळ दुरुस्तीची मागणीमहामार्गावरच आंदोलन केल्यामुळे वाहतुक झाली होती  विस्कळीत

लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर: राष्ट्रीय महामार्ग क्र.६ ची झालेली दयनीय अवस्था व  ठिकठिकाणी पडलेल्या खड्डय़ांमुळे अपघात हे नित्याचेच झाले  आहेत. महामार्गाच्या  तत्काळ दुरुस्तीच्या मागणीसाठी २३ ऑ क्टोबर रोजी तालुका व शहर काँग्रेसच्यावतीने धानोरा  महामार्गावरच रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी  दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
राष्ट्रीय महामार्ग क्र.६ हा मलकापूर ते खामगावपर्यंत खड्डय़ांमुळे  अतिशय खराब झाला आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे  पडल्याने एैन दिवाळीच्या सणात दोन जणांना आपला जीव  गमवावा लागला आहे. या महामार्गाची दुरुस्ती करण्यात यावी  यासाठी अनेक वेळा निवेदने दिली व आंदोलन केली. तरी  प्रशासनाला जाग येत नसल्याने सोमवारी भाराकाँ तालुकाध्यक्ष  अँड. हरीश रावळ, शहराध्यक्ष राजू पाटील, पं.स. सदस्य संदीप  गावंडे, गजानन ठोसर यांच्या नेतृत्वात धानोरा येथून मोर्चा काढून  महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलना  दरम्यान रस्त्यावर पडलेल्या खड्डय़ांना दिवाळीचा फराळ देऊन,  फटाके फोडत पूजन करण्यात आले. सदर रास्ता रोकोदरम्यान  दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. 

Web Title: Stop the Congress way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.