उंद्रीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा रास्ता रोको; वाहतूक विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 12:51 AM2017-12-29T00:51:52+5:302017-12-29T00:52:11+5:30
उंद्री: केळवद येथील वीज उपकेंद्रावर शेतकर्यांनी केलेल्या आंदोलन आणि साहित्याची जाळपोळ प्रकरणात चिखलीचे आ. राहुल बोंद्रे यांना अटक केल्याच्या निषेधार्थ उंद्री येथे युवक काँग्रेसचे महासचिव राम डहाके यांच्या नेतृत्वात गुरुवारी रास्ता रोको करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क

तूर, गहू, हरभरा पिकांच्या ऐन हंगामात चिखली तालुक्यातील केळवद व परिसरातील शेतकर्यांची शेतातील वीज कुठलीही पूर्वसूचना न देता वीज वितरण कंपनीने खंडित केली होती. प्रकरणी आमदार राहुल बोंद्रे व कार्यकर्ते आणि शेतकर्यांनी वीज वितरण कंपनीच्या केळवद येथील कार्यालयात आंदोलन केले होते. आंदोलन आणि कार्यालयाच्या नुकसानप्रसंगी २७ डिसेंबरला दुपारी आ. बोंद्रे यांना व त्यांच्या नऊ कार्यकर्त्यांना चिखली पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने नंतर त्यांना जामीन मंजूर केला होता.
दरम्यान, शेतकरी हिताचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सरकारकडून होत असल्याच्या निषेधार्थ उंद्री येथे युवक काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. बुलडाणा युवक काँग्रेसचे महासचिव राम डहाके यांच्या नेतृत्वात सरपंच प्रदीप अंभोरे, शहराध्यक्ष मनोज लाहुडकार, सुभाष कटारे, रवी तरळकर, राजू बाबुळकर, अनिस पठाण, प्रदीप जाधव, प्रभाकर पाटील, लाला सपकाळ, पुरुषोत्तम ठाकरे, मनवरभाई, शेख गुलाब शेख वसीम यांच्यासह अन्य सहभागी झाले होते.