अनधिकृत लॉटरी विक्री बंद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:21 AM2021-07-23T04:21:25+5:302021-07-23T04:21:25+5:30
कीड मारण्यासाठी गोमूत्राचा आधार बुलडाणा : पिकांवर सध्या ढगाळ वातावरणामुळे अनेक प्रकारच्या कीड पडत आहेत. ही कीड नष्ट करण्यासाठी ...
कीड मारण्यासाठी गोमूत्राचा आधार
बुलडाणा : पिकांवर सध्या ढगाळ वातावरणामुळे अनेक प्रकारच्या कीड पडत आहेत. ही कीड नष्ट करण्यासाठी काही शेतकरी गोमूत्राचा आधार घेत आहेत. गोमूत्रापासून जैविक औषधही बनविण्याकडे कल वाढला आहे.
जलजीवनामुळे शुद्ध पाणी
बुलडाणा : जिल्ह्यातील अनेक गावात आजही नागरिकांना अशुद्ध व गढूळ पाण्याच्या पुरवठा होत आहे. त्यामुळे जलजीवन मिशन अंतर्गत शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी गजानन चव्हाण यांनी केली आहे.
जलसुरक्षा धोक्यात
देऊळगाव राजा : ग्रामीण भागात असलेले बंधारे नादुरुस्त आहेत. त्यामुळे जास्त पाऊस झाल्यास बंधारे, कालव्यातून पाणी पाझरू शकते. अशा नादुरूस्त बंधाऱ्यांमुळे जलसुरक्षा धोक्यात सापडल्याचे चित्र दिसून येत आहे.
वेबसाईट बंदमुळे विद्यार्थी अडचणीत
बुलडाणा : अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी नोंदणीकरिता सुरू असलेली वेबसाईट वारंवार बंद होत आहे. २१ जुलै रोजी ऑनलाईन संकेतस्थळ बंद राहिल्याने विद्यार्थी अडचणीत सापडत आहेत.