मुद्रा बँक योजनेला बळ; बुलडाणा जिल्ह्याच्या वाट्याला ३२ लाख ८९ हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 01:32 PM2018-03-20T13:32:07+5:302018-03-20T13:32:07+5:30
खामगाव : लघु उद्योगांना सहज कर्ज पुरवठा व्हावा, यासाठी तीन वर्षापूर्वी सुरू झालेली मुद्रा बँक योजना जिल्ह्यात थंडबस्त्यात पडली होती. आता मुद्रा बँक योजनेचा लाभ जास्तीत जास्त युवकांना मिळावा, यासाठी राज्यातील चार जिल्ह्यांना १ कोटी ६ लाख ४ हजार ३७४ रुपये निधी देण्यात येणार असून बुलडाणा जिल्ह्याच्या वाट्याला ३२ लाख ८९ हजार ५०० रुपये आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आता मुद्रा बँक योजनेला बळ मिळाले आहे.

लघु उद्योग, छोटे कारखानदार आणि दुकानदार यासह बेरोजगार युवकांना उद्योग उभारण्यासाठी कर्ज पुरवठा उपलब्ध व्हावा, या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ एप्रिल २०२५ मध्ये मुद्रा बँक योजना सुरू केली होती. या योजनेतून सुरूवातीला लघु उद्योजकांना १० लाखापर्यंतचे कर्ज सहज उपलब्ध करून देण्यात आले; परंतू वर्ष उलटण्याच्या आतच मुद्रा बँक योजनेला जिल्ह्यात घरघर लागल्याचे पाहावयास मिळाले. अनेक बँकांनी या योजनेअंतर्गत कर्ज देण्यास नकार दर्शविल्याने जिल्ह्यात मुद्रा बँक योजना थंडबस्त्यात पडली होती. मात्र आता पुन्हा शासनाने बुलडाणा जिल्ह्यात मुद्रा बँक योजना प्रभाविपणे राबविण्यासाठी बळ दिले आहे. मुद्रा बँक योजना ग्रामीण, दुर्गम आणि अती दुर्गम भागात माहिती होण्यासाठी आणि या योजनेचा लाभ गरजू व होतकरू व्यक्ती आणि बेरोजगारांना व्हावा, यासाठी या योजनेचा प्रचार, प्रसार व समन्वयासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मुद्रा बँक योजना समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. राज्यातील चार जिल्ह्यातील मुद्रा बँक योजना जिल्हा समन्वय समितीस १ कोटी ६ लाख ४ हजार ३७४ रुपये निधी देण्यात येणार आहे. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यासाठी ३२ लाख ८९ हजार ५०० रुपये, नाशिक १९ लाख ५४ हजार ८७४, सातारा २० लाख व रत्नागिरी जिल्ह्यासाठी ३३ लाख ६० हजार रुपये निधी देण्यात येणार आहे. राज्यातील चार जिल्ह्यात निधी देण्यात येत असून त्यात बुलडाणा जिल्ह्याचा समावेश असल्याने जिल्ह्यातील लघु उद्योजक व बेरोजगारांना दिलासा मिळाला आहे.
नियंत्रण अधिकाऱ्यांना ठेवावा लागणार हिशोब
मुद्रा बँक योजनेचा निधी कोषागार कार्यालयातून आहरित करण्यााठी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे नियंत्रण अधिकारी राहणार आहेत. त्यानंतर निधीच्या खर्चाचा ताळमेळ ठेवण्याची सर्व जबाबदारी जिल्हाधिकारी म्हणजे मुद्रा बँक योजनेच्या नियंत्रण अधिकाºयांवर राहणार आहे. निधीचा हिशोब ठेवून खर्चाची माहिती वेळोवेळी शासनाला द्यावी लागणार आहे.