आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पक्ष संघटन मजबुत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:37 AM2021-08-19T04:37:57+5:302021-08-19T04:37:57+5:30
बुलडाणा : नगरपालिका , जि.परिषद, पंचायत समिती यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत़ खऱ्या अर्थाने ...
बुलडाणा : नगरपालिका , जि.परिषद, पंचायत समिती यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत़ खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांच्या या निवडणुका असतात. यामधूनच नेतृत्व तयार होत असते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने पक्ष संघटन मजबूत करा, असे आवाहन जिल्हा पक्ष निरीक्षक राजेंद्र तौर यांनी केले़ बुलडाणा तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या आढावा बैठकीत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बेालत हाेते़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. नाझेर काझी व महिला निरीक्षक रिताताई बाविस्कर यांची विशेष उपस्थिती होती. माजी अध्यक्ष ॲड. साहेबराव सरदार, विधानसभा अध्यक्ष नरेश शेळके, महिला जिल्हाध्यक्षा अनुजाताई सावळे, कामगार सेल अध्यक्ष मनोज दांडगे, युवकांचे अध्यक्ष शेखर बोंद्रे, सामाजिक न्यायाचे अध्यक्ष प्रा. धोटे, युवतीच्या अध्यक्षा ॲड. बावस्कर, वक्ता सेलचे अध्यक्ष अमोल वानखेडे, किसान सेलचे अध्यक्ष राजेंद्र जावळे पाटील, मीडिया सेलचे अध्यक्ष महेश देवरे, ओ.बी.सी. सेलचे अध्यक्ष सुभाष देव्हडे, अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष मोबीन अहमद, अतुल लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच यावेळी नरेश शेळके , मनोज दांडगे , अनुजाताई सावळे, अनिल वर्मा, सत्तार कुरेशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले़ तालुका अध्यक्ष डी. एस. लहाने यांनी प्रास्ताविकातून केलेल्या कामाचा अहवाल सदर केला. यावेळी निर्मला तायडे यांना बुलडाणा तालुका कार्याध्यक्षपदी नियुक्ती देण्यात आली. संचलन गौरव देशमुख यांनी केले तर आढावा बैठकीच्या सर्व सेलचे तालुका अध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष सरचिटणीस पदाधिकारी व तालुका पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.