वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे सक्तीने पालन करावे - खासदार प्रतापराव जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 02:39 PM2018-01-25T14:39:55+5:302018-01-25T14:41:00+5:30
बुलडाणा : रस्ता सुरक्षा अत्यंत महत्वाचे असून त्याकरीता समाजात जनजागृती होऊन सामाजिक मानसिकता निर्माण होणे आवश्यक आहे. वाहतूक नियमांचे पालन करीत शिस्तबध्द वाहने चालवल्यास विविध अपघातात प्राणहानी टाळता येते. त्यामुळे वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे सक्तीने पालन करावे, असे आवाहन खासदार प्रतापराव जाधव यांनी केले.
बुलडाणा : रस्ता सुरक्षा अत्यंत महत्वाचे असून त्याकरीता समाजात जनजागृती होऊन सामाजिक मानसिकता निर्माण होणे आवश्यक आहे. वाहतूक नियमांचे पालन करीत शिस्तबध्द वाहने चालवल्यास विविध अपघातात प्राणहानी टाळता येते. त्यामुळे वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे सक्तीने पालन करावे, असे आवाहन खासदार प्रतापराव जाधव यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, मलकापूरचे नगराध्यक्ष हरीष रावळ, जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, कार्यकारी अभियंता चंद्रशेखर शिखरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दिलीप तडवी, जालींधर बुधवत, महादेव पाटील, प्रदीप ब्राम्हणकर, गजानन कडूकार यांची उपस्थिती होती. अपघातामुळे अपघातग्रस्त कुंटूबाचे नुकसान तर होतेच त्याशिवाय देशाची आर्थिक हानी होत असल्याचे सांगत खासदार प्रतापराव जाधव म्हणाले, जर सुरक्षा केली असती तर विविध अपघातात प्राणहानी टाळता आली असती असेही अपघातानंतर लक्षात येते. परंतू एकदा गेलेली वेळ परत येत नाही. अशा झालेल्या सर्व अपघातांची कारणे व त्या संदभार्तील सुस्पष्ट आकडेवारी जनतेसमोर येणे आवश्यक आहे. यामुळे जनजागृती होण्यास मदत होणार आहे. दर वर्षी नवीन वाहनांची संख्या वाढत असून अपघातांची टक्केवारीसुद्धा वाढली आहे. वाहतूक नियमांचे पालन करुन आपल्या जीवनाचे रक्षण करावे. कारण यामुळेच आपले आणि दुसºयांचे जीवाचे रक्षण होऊन अपघात कमी होण्यास मदत होईल. रस्ता सुरक्षेबाबत शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था व अन्य संघटनांनी सहभागी व्हावे, असे ते म्हणाले. नगर परिषद क्षेत्रामध्ये नो पार्किंग झोन जाहीर करण्याचे सूचीत करीत खासदार म्हणाले, ओव्ही लोड वाहनांवर कारवाई करून रस्त्यांचा दर्जाही सांभाळावा. रेती घाटांवरून रेतीची वाहतूक अनेक वाहनांच्या माध्यमातून होते. मात्र या वाहनांमधून क्षमतेपेक्षा किंवा पावतीपेक्षा जास्त रेतीची वाहतूक होते. अशी वाहतूकीस बाध्य करणाºया रेती कंत्राटदारांवर कारवाई करावी. यावेळी लोकप्रतिनिधी, अशासकीय सदस्य यांनी विविध प्रश्न मांडले. बैठकीला समितीचे शासकीय व अशासकीय सदस्य, परिवहन, पोलीस, सार्व. बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.