पहिल्याच दिवशी मेहकरात कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:34 AM2021-05-13T04:34:40+5:302021-05-13T04:34:40+5:30
काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता, जिल्हा प्रशासनाने १० मेच्या रात्री ८ वाजतापासून २० मेपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. या ...
काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता, जिल्हा प्रशासनाने १० मेच्या रात्री ८ वाजतापासून २० मेपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधाची मेहकर शहर व तालुक्यात अंमलबजाणी करण्यात येत आहे. महसूल, नगरपालिका व पोलीस विभागाचे कर्मचारी चौकाचौकात तैनात करण्यात आले आहेत. जिल्ह्यासह मेहकर तालुक्यात दरदिवशी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या वाढतच होती. कोरोनाचे लक्षणे न दिसणारे रुग्ण हेच कोरोनाचे सुपर स्प्रेडर होते. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत होता. हीच स्थिती जिल्ह्याची होती. यामुळे जिल्हा प्रशासनाने २० मेपर्यंत कडक निर्बंध लावले आहेत. मंगळवारी पहिल्याच दिवशी रस्त्यावर शुकशुकाट हाेता. मेहकर शहरातील फक्त दवाखाने व मेडिकल एवढे सोडून इतर सर्व प्रतिष्ठाने बंद होती. नागरिकांनी बंद पाळून प्रशासनाला सहकार्य केले.
या दहा दिवसांच्या कडक निर्बंधामध्ये नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करून, कारोना प्रादुर्भाव कमी होण्यास सहकार्य करावे. अति आवश्यक असेल, तरच घराबाहेर पडावे.
सचिन गाडे, मुख्याधिकारी, नगरपालिका, मेहकर