प्रहार संघटनेचे तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन
By admin | Published: September 20, 2016 12:11 AM2016-09-20T00:11:58+5:302016-09-20T00:11:58+5:30
दिव्यांग बांधवांच्या समस्या तात्काळ निकाली काढण्याची मागणी.
चिखली (जि. बुलडाणा), दि. १९: केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या अधिनियम १९९५ च्या कायद्यान्वये व शासन परिपत्रकाप्रमाणे चिखली तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या प्रलंबित मागण्यांची तातडीने पूर्तता व्हावी, या मागणीसाठी स्थानिक तहसील कार्यालयात प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभवराजे मोहिते यांच्या नेतृत्वात १९ सप्टेंबर रोजी ठिय्या आंदोलन करण्यात आले. नगर परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांनी अर्थसंकल्पाच्या ३ टक्के निधी दिव्यांगांच्या पुनर्वसनाच्या कल्याणासाठी खर्च करणेबाबत सर्व ग्रामपंचायतींना कळवावे व शासननिर्णय झाल्यापासून ज्या ग्रामपंचायतीने तीन टक्के खर्च केला नाही, अशा ग्रमपंचायतींवर कारवाई करण्यात यावी, तीन टक्के निधी नियंत्रण करण्याकरिता तालुकास्तरावर समिती गठीत करावी व त्यावर दिव्यांगांना प्राधान्य देण्यात यावे, भूखंड निवासी व व्यापारी गाळे वाटपामध्ये कायद्याप्रमाणे तीन टक्के दिव्यांगांना देण्यात यावे, शासन निर्णयानुसार ग्रामपंचायतींना दिव्यांगांची नोंदणी करण्याबाबत लेखी आदेश देण्यात, तसेच शासननिर्णय झाल्यापासून ज्या ग्रामपंचायतीने नोंदणी केली नाही, त्यावर कारवाई करण्यात यावी, उंद्री येथे दिव्यांग बांधवांनी आंदोलन करूनही ग्रामपंचायतीने अद्यापपर्यंंत दिव्यांगांच्या मागण्यांची पूर्तता न केल्यामुळे संबंधित ग्रामपंचायत सचिवांवर कारवाई करण्यात यावी, तसेच संजय गांधी निराधार योजनेतून ४0 टक्के दिव्यांग बांधवांचे प्रस्ताव विनाअट तत्काळ मंजूर करण्यात यावेत, आदी मागण्यांचे निवेदन यावेळी तहसीलदारांना देण्यात आले. या आंदोलनात प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभवराजे मोहिते यांच्या नेतृत्वात उपजिल्हा प्रमुख संजय इंगळे, शिवनारायण पोपळकर, तालुकाप्रमुख ङ्म्रीराम सुरोसे, अंबादास गावंडे, सुभाष भोंडे, नामदेव वरते, संदीप गालट, उषा पांडे, केशव शेजोळ, रामदास इंगळे, नवृत्ती शेजोळ, राजू सुरोसे, शे.शेकुर कुरेशी, अहेमद पठाण, विनायक नसवाले, सप्तङ्म्रृंगी सोनुने, सोहेल शे., विठ्ठल पंडित, भानुदास इंगळे, दिलीप वानखेडे, सुभाष भोंडगे, सविता गुरव सहभागी होते.