ग्रामीण डाक कर्मचारी १६ ऑगस्टपासून संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 12:06 AM2017-08-14T00:06:26+5:302017-08-14T00:08:15+5:30
बुलडाणा : आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी भारतातील संपूर्ण ग्रामीण डाकसेवक १६ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी भारतातील संपूर्ण ग्रामीण डाकसेवक १६ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार आहेत.
ब्रिटिश राजवटीने भारतात सुरू केलेल्या काही मूलभूत सुविधांपैकी एक असलेल्या टपाल खात्याने आजच्या अत्याधुनिक दळणवळण यंत्रणेच्या काळातही आपले अस्तित्व जपण्याची धडपड कायम ठेवली आहे. टपाल विभागाला १५0 वर्षे होऊन गेलीत, तरीसुद्धा ग्रामीण डाकसेवकांना अद्याप खात्यामध्ये समाविष्ट केलेले नाही. तुटपुंजा पगारावर त्यांना कुटुंबाचा भार सांभाळावा लागत आहे. मागील केलेल्या संपाच्या आश्वासनाची वाट पाहता अद्याप खात्यामध्ये समाविष्ट केले नाही. मागील सरकारने ६0 वर्षांत ग्रामीण डाकसेवकांकडे लक्षच दिले नाही. तेव्हा संचारमंत्री सुषमा स्वराज व रामविलास पासवान होते. सध्या सरकार भाजपचेच आहे. कमलेशचंद्र कमिटीने सादर केलेल्या अहवालाला संचारमंत्र्यांनी मंजुरात दिलेली आहे व आपल्या शिफारशीची फाइल वित्तमंत्र्यांकडे पाठविण्यात आलेली आहे. अद्याप वित्तमंत्रालयाने मंजुरात दिली नाही. त्यामुळे जनरल सेक्रेटरी एस.एस. महादैवया दिल्ली यांनी १४ ऑगस्टपर्यंत काही न झाल्यास १६ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाण्याचे आदेश दिले आहे. सरकारला याआधी ३0 जून रोजी बेमुदत संपाची नोटिस दिलेली आहे. यावेळी जीडीएस कमिटीचा अहवाल संघटनेने दिलेल्या सूचनानुसार लवकर लागू करा. जीडीएसला आठ घंटे काम देऊन खात्यात समाविष्ट करा. जीडीएसला पेन्शन योजना लागू करा. जीडीएसच्या टारगेटच्या नावाखाली शोषण बंद करा, आदी मागण्या पूर्ण संप करण्यात येणार असल्याची माहिती माजी अध्यक्ष अरुण भानुसे यांनी एका निवेदनाद्वारे कळविले आहे व आपल्या जिल्ह्यात संप १00 टक्के यशस्वी करा, असे आवाहन अरुण भानुसे, कॉ.पी.एस. झाडोकार, कॉ.एस.एस. ढोणे, कॉ.डी.ओ.पाटील, कॉ.जी. आर. देशमुख, रवी निकम, रमेश भवर, दिलीप पाटील यांनी एका निवेदनाद्वारे कळविले आहे.