अडते अडकले शेतमाल हमीभावाच्या भोवर्‍यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 11:38 PM2017-10-29T23:38:42+5:302017-10-29T23:40:54+5:30

बुलडाणा : सोयाबीनला शासनाने ३ हजार ५0 रुपये हमीभाव  ठरवून दिला आहे; मात्र अडते किंवा व्यापार्‍यांनी हमीभावाने  सोयाबीन खरेदी केल्यानंतर सोयाबीन मिल्सकडून  केवळ २  हजार ७00 ते २ हजार ८00 रुपयेच भाव मिळत आहे.

Stuck in the straps of boundaries! | अडते अडकले शेतमाल हमीभावाच्या भोवर्‍यात!

अडते अडकले शेतमाल हमीभावाच्या भोवर्‍यात!

Next
ठळक मुद्देमिल्सकडून अडत्यांना २,८00 रुपये भाव माल पोहोचविण्यास ३00 रुपये खर्च

ब्रम्हानंद जाधव । 
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : सोयाबीनला शासनाने ३ हजार ५0 रुपये हमीभाव  ठरवून दिला आहे; मात्र अडते किंवा व्यापार्‍यांनी हमीभावाने  सोयाबीन खरेदी केल्यानंतर सोयाबीन मिल्सकडून  केवळ २  हजार ७00 ते २ हजार ८00 रुपयेच भाव मिळत आहे. तसेच  सोयाबीन मिल्सपर्यंत माल पोहोचविण्यासाठी येणारा खर्चही  ३00 रुपयांपर्यंत जात आहे.  हमीभाव मिळत नसल्याने शे तकर्‍यांचा रोष आणि सोयाबीन मिल्सकडून मिळणारा अत्यल्प  भाव, यामुळे अडतेच हमीभावाच्या भोवर्‍यात अडकले आहेत. 
मूग, उडीद, सोयाबीन आदी शेतमाल बाजार समितीमध्ये येत  असून, त्यासाठी शासनाने हमीभाव ठरवून दिलेला आहे; परंतु  बाजार समितीमध्ये अडते व व्यापार्‍यांकडून शेतमालाला  हमीभाव मिळत नाही. मुगासाठी ५ हजार ५७५ रुपये प्रति िक्ंवटल हमीभाव असतानाही मुगाला ४ हजार ते ४ हजार ५00  रुपयेच हमीभाव मिळत आहे. उडिदाला ५ हजार ४00 रुपये  हमीभाव असून, सध्या २ हजार ५00 ते ३ हजार रुपयेच भाव  मिळत आहे. त्यानंतर सोयाबीनला ३ हजार ५0 रुपये हमीभाव  ठेवलेला असतानाही  २ हजार ५00 रुपयांपर्यंत भाव दिला जात  आहे. शासनाकडूनसुद्धा अडत्यांना हमीभावाने शेतमाल खरेदी  करण्याचे आदेश दिले जातात; परंतु अडत्यांनी खरेदी केलेल्या  मालाला योग्य भाव मिळत नसल्याने अडतेसुद्धा शेतमाल  हमीभावाने खरेदी करण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत. एफए क्यू सोयाबीनचा माल हा बाजार समितीमध्ये २ हजार ५00 ते २  हजार ५५0 रुपये क्विंटलने खरेदी केला तर तोच माल सोयाबीन  मिल्स २ हजार ७00 ते २ हजार ८00 भावाने अडत्यांना द्यावा  लागतो. त्यानंतर सोयाबीन मिल्सपर्यंत माल पोहोचण्यासाठी  २५0 ते ३00 रुपये खर्च लागतो.
 वाहन भाडे, बटाव कमिशन, बारदाना एक किलो कट्टी, माती  डागी, आर्दता क्लेमसुद्धा करण्यात येतो. शासनाच्या हमीभावाचा  नियम मिल्सला न लावता केवळ अडते किंवा व्यापार्‍यांनाच  लावला जातो. मिल्सकडून शासनाच्या हमीभावाप्रमाणे शेतमाल  ७00 ते १२00 रुपये फरकाने खरेदी केल्या जात असल्याने  अडतेसुद्धा शासनाच्या हमीभावाप्रमाणे माल खरेदी करण्यासाठी  अडचणीत सापडत आहेत. 

धुळ्याला जातो बुलडाण्याचा माल 
बुलडाणा जिल्ह्यातील १३ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये  सध्या सोयाबीनची खरेदी सुरू आहे. अडत व व्यापार्‍यांकडून  खरेदी केलेली सोयाबीन धुळे येथील  मिल्सला पाठविल्या जाते;  परंतु सोयाबीन मिल्सवर योग्य भाव अडत्यांना भेटत नसल्याने  अडते व व्यापारीसुद्धा शेतकर्‍यांना हमीभाव देत नाहीत.   

गरजवंतांचीच सोयाबीन बाजार समितीत 
जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या सोयाबीनला  योग्य भाव मिळत नसल्याने अनेक शेतकर्‍यांनी सोयाबीनचा  माल घरीच साठून ठेवलेला आहे; मात्र आर्थिक अडचण  असलेले शेतकरी मिळेल त्या भावात सोयाबीन विक्री करीत  आहेत. आर्थिक नड भागविण्यासाठी शेतकर्‍यांना कमी भावात  सोयाबीन विक्री करण्याशिवाय पर्याय नसल्याने बाजार समि तीमध्ये बहुतांश गरजवंत शेतकर्‍यांचेच सोयाबीन विक्रीसाठी येत  आहे.

या कारणांमुळे मिळत नाही हमीभाव
- अडत्यांनी खरेदी केलेल्या सोयाबीनला मिल्सवर केवळ २  हजार ८00 रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. त्यामुळे अडते कमी  दरात सोयाबीन खरेदी करतात. 
- हमीभावाचा नियम हा फक्त अडते किंवा व्यापार्‍यांनाच आहे,  हा नियम कुठल्याही मिल्स वाल्याला लावला जात नाही.  त्यामुळे अडत्यांच्या मालाला भाव मिळत नाही. 
- मिल्सवर माल पोहोचण्यासाठी २५0-३00 रुपये खर्च आहे.  त्यानंतर मोटार भाडे, बटाव कमिशन, बारदाना एक किलो कट्टी,  माती डागी, आर्द्रता, क्लेम करण्यात येतो.
- मिल्सवर शेतमाल आल्यानंतर १0 ते १२ आर्द्रतेपर्यंतचा माल  असल्यास १ किलोचे पैसे कापण्यात येतात. त्यानंतर १२ पेक्षा  जास्त आर्द्रता असल्यास कपातही डबल होते. डागी माल  मिल्सवर आल्यानंतर कपात केली जाते. 

Web Title: Stuck in the straps of boundaries!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती