वृक्षसंवर्धनासाठी विद्यार्थी कृषिमित्र पुरस्कार योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 07:07 PM2017-07-19T19:07:31+5:302017-07-19T19:08:23+5:30

बुलडाणा : वृक्ष लागवडीची आवड निर्माण होवून वृक्ष संवर्धनाची संकल्पना बालवयात निर्माण व्हावी, या उद्देशाने नांदूरा तालुक्यातील ग्रामपंचायत काटीने वृक्षमित्र पुरस्कार योजना राबविण्यास सुरूवात केली आहे.

Student Cancer Award Prize Scheme for Tree Conservation | वृक्षसंवर्धनासाठी विद्यार्थी कृषिमित्र पुरस्कार योजना

वृक्षसंवर्धनासाठी विद्यार्थी कृषिमित्र पुरस्कार योजना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : वृक्ष लागवडीची आवड निर्माण होवून वृक्ष संवर्धनाची संकल्पना बालवयात निर्माण व्हावी, या उद्देशाने नांदूरा तालुक्यातील ग्रामपंचायत काटीने वृक्षमित्र पुरस्कार योजना राबविण्यास सुरूवात केली आहे. या योजनेअंतर्गंत मराठी प्राथमिक शाळेत २०० विद्यार्थ्यांना विविध जातीचे रोपे देवून १८ जुलै रोजी शुभारंभ करण्यात आला. सदर योजनेअंतर्गंत वृक्षारोपण करून वृक्षसंवर्धन करणाऱ्या विद्यार्थ्यास १५ आॅगस्ट २०१८ रोजी वृक्षमित्र पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे.
नांदूरा पंचायत समितीअंतर्गंत येत असलेल्या काटी येथे वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाची आवड बालवयातच निर्माण व्हावी व वृक्ष संवर्धनाची संस्कृतीची संकल्पना बालवयात रुजावी या हेतूने ग्रामविकास अधिकारी प्रशांत जामोदे व सरपंच विठ्ठल पाटील व सर्व ग्रा.पं.सदस्य यांनी अभिनव योजना राबविली.  यासाठी ग्रामपंचायतच्या सामान्य फंडातून ह्यविद्यार्थी वृक्षमित्र पुरस्कारह्ण योजना आयोजित केली. त्यानुसार मराठी प्राथमिक शाळा काटी येथील शाळेत शिक्षण घेत असलेल्या २०० विद्यार्थ्यांना ग्रा.पं.च्या वतीने विविध प्रजातीची रोपे मोफत उपलब्ध करुन दिली. एक विद्यार्थी एक रोपटे यानुसार प्रत्येक विद्यार्थ्यांना एक रोपटे मोफत ग्रा.पं.सरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रा.पं.सदस्य यांचे हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य मराठी प्रा.शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. 

जिवंत झाडाची पाहणी केल्यानंतर पुरस्कार
विद्यार्थी कृषिमित्र पुरस्कार योजनेअंतर्गंत सदर रोपटे विद्यार्थ्याने आपल्या अंगणात, शेतात, घराच्या परिसरात लागवड करुन त्याचे संवर्धन करावयाचे आहे. पुढील १ वर्षानंतर सदर जिवंत झाडाची पाहणी करुन ज्या विद्यार्थ्यांनी झाड जगविले, त्याचा १५ आॅगस्ट २०१८ या दिवशी ग्रामपंचायतच्या वतीने ‘विद्यार्थी कृषिमित्र पुरस्कार’ देवून सन्मान करण्यात येणार आहे. सदर पुरस्कारात सन्मानपत्र व विशेष पारितोषिक देण्याचा मानस सचिव प्रशांत जामोदे व सरपंच विठ्ठल पाटील यांनी केला आहे.

Web Title: Student Cancer Award Prize Scheme for Tree Conservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.