विद्युतवरील दुचाकी निर्माण करणाऱ्या टिममध्ये डोणगावचा विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 05:28 PM2018-07-28T17:28:52+5:302018-07-28T17:30:07+5:30

डोणगाव : विद्युतवर चालणारी दुचाकी निर्माण करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये समावेश असलेल्या येथील सोमेश जैस्वाल यांचा ग्रामस्थांचावतीने सत्कार करण्यात आला.

Student of Dongaon, in a team producing electric bikes | विद्युतवरील दुचाकी निर्माण करणाऱ्या टिममध्ये डोणगावचा विद्यार्थी

विद्युतवरील दुचाकी निर्माण करणाऱ्या टिममध्ये डोणगावचा विद्यार्थी

googlenewsNext
ठळक मुद्देसुनिल जैस्वाल यांचा मुलगा सोमेश सध्या वाराणसी येथील इंडियन इंस्टीट्युट आॅफ टेक्नॉलॉजी येथे शिकत आहे. त्याच्या कामगिरीबद्दल डोणगाव येथे मित्रसागर परिवाराच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला.

डोणगाव : विद्युतवर चालणारी दुचाकी निर्माण करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये समावेश असलेल्या येथील सोमेश जैस्वाल यांचा ग्रामस्थांचावतीने सत्कार करण्यात आला. येथील व्यापारी सुनिल जैस्वाल यांचा मुलगा सोमेश सध्या वाराणसी येथील इंडियन इंस्टीट्युट आॅफ टेक्नॉलॉजी येथे शिकत आहे. वाराणसी हिंदू विद्यापीठाच्या ११ विद्यार्थ्यांनी एवरेरा इलेक्ट्रीकल वाहन श्रेणीतील ३५० कि.मी. प्रतीघंटा वेगाने विजेवर चालणारी तीनचाकी वाहनाचे डिझाईन तयार करून तिची निर्मिती केली आहे.  इलेक्ट्रीक वाहनात मोटर कंट्रोलर लावलेले असून ११ सदस्याच्या टिममध्ये डोणगाव येथील इंजिनिअर सोमेश आहे. तो नुकताच सिंगापूर येथून डोणगावला आला. त्याच्या कामगिरीबद्दल डोणगाव येथे मित्रसागर परिवाराच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी सरपंच जुबेरखान व प्रमुख अतिथी म्हणून पं.स.सदस्य निंबाजी पांडव, सुनिल जैस्वाल उपस्थित होते. सरपंच जुबेरखान यांच्या हस्ते सोमेशचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा.गजानन सातपुते, मुख्याध्यापक आत्मारात दांदडे, हमीद मुल्लाजी यांनीही मनोगत व्यक्त केले. संचालन गजानन सातपुते तर आयोजन अंकुश सावजी, सुरेश फिसके यांनी केले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख प्रकाश मानवतकर, सुनिल पळसकर, जमिल पठाण, सुभाष अढाव, आनंद सावजी, शैलेश आखाडे, अबरार खान, जावेद खान, जैनुलअवेदीन सह गावकरी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Student of Dongaon, in a team producing electric bikes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.