स्वातंत्र्य दिनापासून जिल्ह्यात एक विद्यार्थी एक वृक्ष माेहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:40 AM2021-08-14T04:40:36+5:302021-08-14T04:40:36+5:30

या भारत वृक्षक्रांती मोहिमेचे तथा ‘एक विद्यार्थी एक वृक्ष’ या संकल्पनेचे मुख्य प्रवर्तक ए. एस. नाथन यांच्या संकल्पनेतून ही ...

A student has planted a tree in the district since Independence Day | स्वातंत्र्य दिनापासून जिल्ह्यात एक विद्यार्थी एक वृक्ष माेहीम

स्वातंत्र्य दिनापासून जिल्ह्यात एक विद्यार्थी एक वृक्ष माेहीम

googlenewsNext

या भारत वृक्षक्रांती मोहिमेचे तथा ‘एक विद्यार्थी एक वृक्ष’ या संकल्पनेचे मुख्य प्रवर्तक ए. एस. नाथन यांच्या संकल्पनेतून ही मोहीम संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात राबविली जाणार आहे. या वृक्षक्रांती मोहिमेची सुरुवात १५ ऑगस्टला जिल्हा परिषद मुलांची शाळा येथे सकाळी ९:३० वाजता बुलडाणा जिल्हा परिषद अध्यक्षा मनीषा पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्षा कमल बुधवत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा उपवनसंरक्षक अक्षय गजभिये, सामाजिक वनीकरणचे विभागीय अधिकारी डी. एस. पायघन, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, प्राथमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप आणि या मोहिमेचे मुख्य प्रवर्तक ए. एस. नाथन प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

या वृक्षक्रांती मोहिमेत प्रत्येक विद्यार्थ्याला एक मोफत रोप देण्यात येणार असून, जिल्ह्यात पाच लाख १४ हजार विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत. या मोहिमेत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय स्तरावर विशेष गुण देण्यात येणार आहेत. या मोहिमेत सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Web Title: A student has planted a tree in the district since Independence Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.