पर्यावरण रक्षणासाठी सरसावले चिमुकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 01:32 PM2019-08-27T13:32:35+5:302019-08-27T13:32:40+5:30

राष्ट्रीय हरित सेनेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून ही कार्यशाळा आयोजित करण्यात येत असून असंख्य विद्यार्थ्यांनी यासाठी सहभाग नोंदविला होता.

Student in khamgaon forwarde To protect the environment | पर्यावरण रक्षणासाठी सरसावले चिमुकले

पर्यावरण रक्षणासाठी सरसावले चिमुकले

Next

 
खामगाव. झिमझिम पावसाला न जुमानता आपल्या आवडीच्या उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा   येथील श्री. अरजण खिमजी नॅशनल हायस्कूल मध्ये मैदानावर जमलेले बाल मुर्तीकारांना पाहून अनुभवायला मिळाले.  निमित्त होते ते पर्यावरणपूरक गणेशमुर्ती प्रशिक्षण कार्यशाळेचे.  राष्ट्रीय हरित सेनेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून ही कार्यशाळा आयोजित करण्यात येत असून असंख्य विद्यार्थ्यांनी यासाठी सहभाग नोंदविला होता. तीनशेहून अधिक स्पर्धकांनी सुंदर, सुबक व आकर्षक शाळूमातीची गणेशमुर्ती कलाध्यापक संजय गुरव यांचे मार्गदर्शनाखाली तयार करून उपस्थितांची मने जिंकून घेतली.गेल्या दोन दशकांपासून या विद्यालयात ईको फ्रेण्डली गणेशमुर्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत असून शहरातील इतरही विद्यार्थी या प्रशिक्षण कार्यशाळेत सामिल होतात. पर्यावरणपूरक गणेशमुर्ती सोबतच रंगलेपन सुध्दा पर्यावरणपूरक कसे करावे याबद्दलचे मार्गदर्शन या प्रसंगी राष्ट्रीय हरित सेनेचे मास्टर ट्रेनर कलाध्यापक संजय गुरव देत असतात. घरीच ईको फ्रेण्डली गणेशमुर्ती विसर्जन करून पुन्हा माती उपयोगी आणता येते व जल प्रदूषण टाळता येते या बद्दलची माहिती खेळीमेळीच्या पध्दतीने देवून विद्यार्थ्यांना विषय पटवून दिल्या जातो. सहज सोपे सुटे भाग तयार करून ते एकमेकांना जोडल्यास चटकन गणेशमुर्ती तयार करण्याची जादूच जणू या कार्यशाळेचे प्रसंगी शिकविली जाते.यावेळी पर्यावरण रक्षणासाठी आपण प्रत्येक सन ईको फ्रेण्डली साजरा करावा असा संदेश संस्थेचे अध्यक्ष दिनेश संघवी यांनी दिला.त्याच प्रमाणे जर आपण संकल्प केला तर या उत्सवा दरम्यान विसर्जन स्थळी मोठ्या प्रमाणावर जल प्रदूषण टाळता येते असे प्रतिपादन संस्थेच्या प्राचार्या प्रविणा शहा यांनी केले.यावेळी आकर्षक गणेशमुर्ती निर्मिती करणार्या स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली. प्रशिक्षण कार्यशाळेच्या यशस्वी करण्यासाठी रूपाली वानखडे , शिवाजी गोलाईत ,निखिल शहा ,औदुंबर दिगंबर , जागृत मोमाया,विजय कापडे,विजय महाजन तसेच इयत्ता आठवीचे विद्यार्थी ओम राहटोळे,शिवा इंगळे, प्रणव पाटील,पियुष देशमुख, दुर्गेश अहिर,पियुष मांडवेकर यांनी  परिश्रम घेतले.

Web Title: Student in khamgaon forwarde To protect the environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.