ई-शिष्यवृत्तीतील बदलाने विद्यार्थी गोंधळात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 12:05 AM2017-08-17T00:05:46+5:302017-08-17T00:09:37+5:30

बुलडाणा : मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सन २0१७-१८ या शैक्षणिक वर्षात मट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क योजनेची नवीन  संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे. सदर संकेतस्थळ ३ ऑगस्टपासून सुरू झालेले असून, ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. ई-शिष्यवृत्ती प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल करण्यात आले असून, या बदलामुळे विद्यार्थी गोंधळात आहेत. 

Students are confused with e-scholarship changes! | ई-शिष्यवृत्तीतील बदलाने विद्यार्थी गोंधळात!

ई-शिष्यवृत्तीतील बदलाने विद्यार्थी गोंधळात!

Next
ठळक मुद्देशिष्यवृत्ती योजनेची संगणकीय प्रणाली विकसित ऑनलाइन अर्जाची ३१ ऑगस्टपर्यंत मुदत आधार नसलेल्या विद्यार्थ्यांना अडचणी

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सन २0१७-१८ या शैक्षणिक वर्षात मट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क योजनेची नवीन  संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे. सदर संकेतस्थळ ३ ऑगस्टपासून सुरू झालेले असून, ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. ई-शिष्यवृत्ती प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल करण्यात आले असून, या बदलामुळे विद्यार्थी गोंधळात आहेत. 
विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकून ठेवण्यासाठी तसेच त्यांना आर्थिक हातभार लावण्यासाठी विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येतात. मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सन २0१७-१८ या शैक्षणिक वर्षात मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क योजनेची नवीन  संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे. शिष्यवृत्तीचे हे ऑनलाइन  संकेतस्थळ ३ ऑगस्टपासून सुरू झालेले आहे; परंतु या ई-शिष्यवृत्ती प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल करण्यात आल्याने विद्यार्थ्यांंचे शिष्यवृत्तीचे अर्ज करण्यासाठी विविध अडचणी येत आहेत. ई-शिष्यवृत्तीच्या या प्रणालीमध्ये शैक्षणिक वर्षात मागील वर्षीप्रमाणे विद्यार्थी नूतनीकरण करण्याची सुविधा नसल्यामुळे सर्व पात्र अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी उपरोक्त संकेतस्थळावर नोंदणी करून ऑनलाइन अर्ज सादर करणे गरजेचे आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्यांंनी पात्र अनु. जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांंना अर्ज भरण्याकरिता अवगत करून लेखी सूचित करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत, तसेच ऑनलाइन अर्ज भरण्याकरिता महाविद्यालयाच्या सूचना फलकांवर सूचना देणे गरजेचे आहे. कोणताही पात्र मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही, याची महाविद्यालय प्राचार्य यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त, समाजकल्याणकडून करण्यात आले आहे; मात्र अनेक शाळेत यासंदर्भात विद्यार्थ्यांंना मार्गदर्शन करण्यात आले नाही किंवा शाळेतील सूचना फलकावर सूचनाही देण्यात आल्या नाहीत. या नवीन प्रणालीपासून विद्यार्थी अनभिज्ञ असल्याने विद्यार्थ्यांंना शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी विविध अडचणी येत आहेत.

आधार नसलेल्या विद्यार्थ्यांंना अडचणी
शिष्यवृत्तीची या प्रणालीमध्ये अनु. जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांंना अर्ज भरणे बंधनकारक आहे. ही प्रणाली आधारबेस असल्यामुळे सर्व अनु. जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांंना आपले आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करून घेणे गरजेचे आहे; परंतु अनेक विद्यार्थ्यांंकडे अद्यापही आधार कार्ड नाही. त्यामुळे आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांंना शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी अडचणी येत आहेत. 

Web Title: Students are confused with e-scholarship changes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.