विद्यार्थ्यांचे मेडिकल व आयआयटी, जेईई प्रवेशाचे स्वप्न साकार करणार - सहकार विद्या मंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:34 AM2021-04-18T04:34:46+5:302021-04-18T04:34:46+5:30

त्यानुसार ऐलन कोचिंग क्लासेस, कोटा यांच्याशी संपर्क साधून बुलडाणा येथे ऐलन क्लासेस विद्यार्थ्याच्या सेवेसाठी आणले. ऐलन क्लासेस हे भारतात ...

Students' dream of medical and IIT, JEE admission will come true - Sahakar Vidya Mandir | विद्यार्थ्यांचे मेडिकल व आयआयटी, जेईई प्रवेशाचे स्वप्न साकार करणार - सहकार विद्या मंदिर

विद्यार्थ्यांचे मेडिकल व आयआयटी, जेईई प्रवेशाचे स्वप्न साकार करणार - सहकार विद्या मंदिर

googlenewsNext

त्यानुसार ऐलन कोचिंग क्लासेस, कोटा यांच्याशी संपर्क साधून बुलडाणा येथे ऐलन क्लासेस विद्यार्थ्याच्या सेवेसाठी आणले. ऐलन क्लासेस हे भारतात सर्वोत्कृष्ट आयआयटी व जेईई निकाल देण्यासाठी प्रसिध्द आहे. ऐलन क्लासेसने बुलडाणा येथे सहकार विद्या मंदिरचा क्लासेस स्थापन करण्याचा प्रस्ताव मान्य केला. या क्लासेसच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांना उत्तम प्रतीची शैक्षणिक साधन सामुग्री उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच कम्प्युटर लॅब, ग्रंथालय, विद्यार्थ्यांना राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. पालक व विद्यार्थ्यांनी संस्थेवर ठेवलेला हा विश्वास सार्थक करण्यासाठी त्यांना आधुनिक शिक्षण देण्यात येणार आहे. नियमीत घेणारे वर्ग, सराव परीक्षा, पालकांशी संपर्क, विद्यार्थ्यांचे रोज क्लासेस या व्यतिरिक्त होणारे क्लासेस ही या क्लासेसची वैशिष्ट्ये आहेत. बुलडाणा अर्बण चॅरिटेबल सोसायटीच्या माध्यमातुन हा उपक्रम आणण्यात आला आहे. निश्‍चितच या उपक्रमामुळे बुलडाणा व परिसरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक फायदा होणार असुन विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण

उपलब्ध होईल, असा विश्‍वास बुलडाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी यांनी व्यक्त केला. (वा.प्र.)

Web Title: Students' dream of medical and IIT, JEE admission will come true - Sahakar Vidya Mandir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.