स्मार्ट फोन नसल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:39 AM2021-07-14T04:39:45+5:302021-07-14T04:39:45+5:30
जलसाक्षरता अभियानांतर्गत कार्यशाळा बुलडाणा : भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, बुलडाणा व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने जलसाक्षरता ...
जलसाक्षरता अभियानांतर्गत कार्यशाळा
बुलडाणा : भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, बुलडाणा व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने जलसाक्षरता अभियानांतर्गत ऑनलाईन कार्यशाळा सोमवारी पार पडली. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त घेण्यात आलेल्या या कार्यशाळेत राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.
वृक्षलागवडीला प्रोत्साहन
बुलडाणा: वन, सामाजिक वनीकरण आणि एफडीसीएम या विभागाकडून वनमहोत्सव कालावधीत सवलतीच्या दराने रोपे उपलब्ध करून दिली जातात. सामाजिक वनीकरण विभागाकडून रोपे उपलब्ध करुन देण्यात येतात. प्रत्येकाने वृक्षलागवड करावी व वृक्षलागवडीसाठी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन सामाजिक वनीकरण विभागाकडून करण्यात येत आहे.
व्यावसायिकांना परवान्यात सुधारणा ३१ ऑक्टोबरची मुदत
बुलडाणा : अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत असलेला परवाना हा अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी विकसित केलेल्या नवीन प्रणालीमध्ये योग्य अन्न पदार्थांच्या संवर्गात बदलून घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे सर्व उत्पादकांनी त्यांच्याकडे असणाऱ्या परवान्यात सुधारणा करण्यासाठी ३१ ऑक्टोबरची मुदत देण्यात आली आहे.
बसस्थानकात सुविधांचा अभाव
मेहकर : येथील बसस्थानकावर सुविधांचा अभाव असल्याचे दिसून येत आहे. यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. नियमित स्वच्छतेकडेदेखील एसटी प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे, अशी मागणी सर्व प्रवासी व येथील नागरिकांच्या वतीने होत आहे.