विद्यार्थिंनींनी दिला बेटी बचाव व झाडे वाचवाचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 01:58 PM2018-02-02T13:58:27+5:302018-02-02T13:59:20+5:30
डोणगाव : स्थानिक श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन २९ ते ३१ जानेवारी दरम्यान संपन्न झाले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान नाटीकेच्या माध्यमातून विद्यार्थिंनींनी बेटी बचाव व झाडे वाचवाचा संदेश दिला.
डोणगाव : स्थानिक श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन २९ ते ३१ जानेवारी दरम्यान संपन्न झाले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान नाटीकेच्या माध्यमातून विद्यार्थिंनींनी बेटी बचाव व झाडे वाचवाचा संदेश दिला.
या स्नेहसंमेलनाचे उद्घाटक म्हणून जीवन विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबाराव खडसे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थाध्यक्ष राजेंद्र आखाडे व प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी किशोर पागोरे, नितीन शिंगणे, ठाणेदार आकाश शिंदे, संस्थासचिव प्रल्हादराव आखाडे, कोषाध्यक्ष बळीराम बाजड, रामदास शिंगणे आदी मान्यवर होते. यावेळी वर्ग ११ च्या मुलींनी स्वागत गिताने मान्यवरांचे स्वागत केले व नंतर आनंद बाजार आणि सायंकाळी विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम झाले. तर ३० जानेवारीला वर्ग ११ च्या वाणिज्य शाखेच्या विद्यार्थीनींनी बेटी बचाव व बेटी पढावचा संदेश देत नाटीका सादर केली. तर वर्ग ९ च्या विद्यार्थीनींनी वृक्ष वाचवा वृक्ष जगवाचा संदेश देत पर्यावरणाचे रक्षण करण्याचे आवाहन केले. तर ३० जानेवारीला तुफान विनोदी कार्यक्रम डॉ.मिर्झा रफी अहमद बेग यांनी मिर्झा एक्सप्रेस सादर केली तर सायंकाळी ३० जानेवारीला व ३१ जानेवारीला विद्यार्थ्यांनी लोकनृत्य, बंजारा गित, फिल्मी गित, कॉपीमुक्त अभियान, धार्मिक नृत्य सादर केले. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे प्राचार्य एस.एम.बाजड, सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.