बसस्थानकावर विद्यार्थ्यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 01:23 AM2017-09-28T01:23:10+5:302017-09-28T01:23:20+5:30

शेलगाव देशमुख : अनेक वेळा निवेदन देऊनही विद्यार्थ्यांना  न्याय मिळत नसल्याने २६ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजतापासून  १0.३0 वाजतापर्यंत विद्यार्थी व पालकांनी शेलगाव देशमुख बस  स्थानकावर डोणगाव व विश्‍वीकडून येणार्‍या बस थांबवून बस  रोको आंदोलन केले.

Students movement in bus station | बसस्थानकावर विद्यार्थ्यांचे आंदोलन

बसस्थानकावर विद्यार्थ्यांचे आंदोलन

googlenewsNext
ठळक मुद्देडोणगाव व विश्‍वीकडून येणार्‍या बस थांबवून केले आंदोलनबससेवा सुरळीत करण्याची मागणी 

लोकमत न्यूज नेटवर्क
शेलगाव देशमुख : अनेक वेळा निवेदन देऊनही विद्यार्थ्यांना  न्याय मिळत नसल्याने २६ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजतापासून  १0.३0 वाजतापर्यंत विद्यार्थी व पालकांनी शेलगाव देशमुख बस  स्थानकावर डोणगाव व विश्‍वीकडून येणार्‍या बस थांबवून बस  रोको आंदोलन केले.
शेलगाव देशमुख, कनका बु. व विश्‍वी येथून दररोज जवळपास  १५0 विद्यार्थी शाळा, महाविद्यालयामध्ये येणे-जाणे करतात.   त्याचबरोबर परिसरातील नागरिकांना बँक, दवाखाना व इतर  महत्त्वाच्या कामासाठी दररोज प्रवास करावा लागतो. शेलगाव  देशमुख येथील विद्यार्थी व पालकांनी अनेक वेळा मेहकर  आगारप्रमुख यांना रात्री मुक्काम व दुपारी १२.३0 ला विद्या र्थ्यांच्या सोयीसाठी बससेवा सुरु करण्याची मागणी केली; परंतु  आगारप्रमुख या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे  शैक्षणिक नुकसान होत होते. या आगार प्रमुखाच्या गलथान  कारभाराला कंटाळून शेलगाव देशमुख येथील विद्यार्थी व  पालकांनी मंगळवारी बससेवा बंद पाडली.  यावेळी विद्यार्थी व  पालक यांनी जोपर्यंत मेहकर आगारप्रमुख लेखी देत नाहीत, तो पर्यंत बस सोडणार नाही, असा आग्रह धरला. शेवटी पोलीस  प्रशासनाने आगार प्रमुखास फोन करून घटनास्थळावर  बोलावले. मेहकर आगारप्रमुख जुमडे व डोणगाव पोलिस  स्टेशनचे ठाणेदार आकाश शिंदे हे घटनास्थळी येवून विद्यार्थी व  पालक यांचे म्हणणे प्रत्यक्ष लेखी घेऊन त्यांना यानंतर दररोज  बससेवा वेळेवर सोडण्यात येईल व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक  नुकसान होणार नाही आणि चालक व वाहक यांना सुद्धा  चांगल्या वागणुकीच्या सुचना देण्यात येतील, असे लेखी  आश्‍वासन दिल्यानंतर बससेवा सुरळीत करण्यात आली. 

Web Title: Students movement in bus station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.