विद्यार्थ्यांनी बघितली गुरू आणि शनि यांची युती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:25 AM2020-12-27T04:25:22+5:302020-12-27T04:25:22+5:30

मेहकर : अवकाशात गुरू आणि शनि यांची झालेली युती पाहण्याचा योग येथील मेएसो विद्यालयातील अटल टिंकरिंग लॅबच्या विद्यार्थ्यांना ...

The students saw the alliance of Jupiter and Saturn | विद्यार्थ्यांनी बघितली गुरू आणि शनि यांची युती

विद्यार्थ्यांनी बघितली गुरू आणि शनि यांची युती

Next

मेहकर : अवकाशात गुरू आणि शनि यांची झालेली युती पाहण्याचा योग येथील मेएसो विद्यालयातील अटल टिंकरिंग लॅबच्या विद्यार्थ्यांना आला.

डिसेंबर महिना हा खगोल दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. या महिन्यात सौर मंडळातील दोन मोठे ग्रह गुरू आणि शनि ३९७ वर्षांनंतर आपल्या कक्षेत परिभ्रमण करता करता एक दुसऱ्याजवळ आले होते. हा दुर्मीळ योग २१ डिसेंबर २०२० रोजी आला होता. यानंतर १५ मार्च २०८० हा योग येण्याची शक्यता आहे. पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यासाठी ३६५ दिवस म्हणजेच एक वर्ष लागतो. परंतु बृहस्पतीला बारा वर्षे लागतात व शनिला ३० वर्षे लागतात प्रत्येक २० वर्षांनंतर सूर्याभोवती भ्रमण करत असताना अशा स्थितीत दोन्ही ग्रह जवळ येतात; परंतु यावर्षी हा शनि ग्रह अगदी जवळ आला होता. या कारणामुळे या प्रसंगाची रोचकता अधिक वाढलेली होती. चांदीसारख्या चमकदार रंगाच्या आवरणात गुंडाळलेला शनि त्याचबरोबर गुरूचे चार उपग्रह डायनामाइड, कैलेश स्टो आईओ व युरोपादेखील दिसले. या घटनेमध्ये दोन्ही उपग्रहातील अंतर फक्त एक डिग्री एवढे होते. हे दोन्ही ग्रह इतक्या जवळ आले की ते एक बिंदू रूप दिसत होते. त्यांना एकाच वेळी व एकाच टेलिस्कोपने पाहण्याचा योग स्थानिक अटल टिंकरिंग लॅबच्या विद्यार्थ्यांना आला, अशी माहिती अटल टिंकरिंग लॅबच्या संचालिका समिधा मिश्रा यांनी दिली आहे.

Web Title: The students saw the alliance of Jupiter and Saturn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.