विद्यार्थ्यांनी शास्त्रज्ञ बनून देशाचा विकास करावा- मायी

By admin | Published: September 26, 2016 02:40 AM2016-09-26T02:40:06+5:302016-09-26T02:40:06+5:30

मेहकरात ‘वैज्ञानिक विचारांचा विकास’ या विषयावर कार्यशाळा.

Students should become a scientist and develop the country - Maya | विद्यार्थ्यांनी शास्त्रज्ञ बनून देशाचा विकास करावा- मायी

विद्यार्थ्यांनी शास्त्रज्ञ बनून देशाचा विकास करावा- मायी

Next

मेहकर(जि. बुलडाणा), दि. २५- विद्यार्थ्यांनी शास्त्रज्ञ बनून देशाच्या विकासात हातभार लावावा. त्यांनी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने देशात दुसरी हरितक्रांती आणण्याची गरज असल्याचे मत परभणी कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू चारुदत्त मायी यांनी व्यक्त केले.
संस्कृती कला मंच भारत सरकार, विद्याभारती शाखा मेहकर व मेएसो मेहकर यांच्या संयुक्त विद्यमाने ह्यवैज्ञानिक विचारांचा विकासह्ण या विषयावर एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन येथील गजानन महाराज मंदिराच्या सभागृहात करण्यात आले होते. कार्यशाळेच्या उद्घाटन सोहळ्याला मेएसोचे अध्यक्ष रवींद्र अवस्थी हे अध्यक्षस्थानी होते. उद्घाटक म्हणून गजानन महाराज सेवा समितीचे अध्यक्ष श्याम उमाळकर, प्रमुख मार्गदर्शक म्हणून गजानन निमदेव, डीआरडीओचे हैद्राबादचे वरिष्ठ शास्त्रज्ञ धनंजय जहागीरदार, ईशवेद बायोटेकचे कार्यकारी संचालक संजय वायाळ, प्रा. विजय देशमुख, विद्याभारतीचे पश्‍चिम क्षेत्राचे उपाध्यक्ष प्रेमराज भाला, प्रांत सहमंत्री रामेश्‍वर कुटे, संयोजिका समिधा मिश्रा यावेळी व्यासपीठावर उपस्थित होत्या. उद्घाटनपर भाषणात उमाळकर यांनी अध्यात्म व संस्कृतीमुळे देशाची ओळख असल्याचे सांगितले. यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे प्रास्ताविक समिधा मिश्रा यांनी केले. संचालन अरविंद चव्हाण यांनी तर आभारप्रदर्शन सतीश ठोकरे यांनी केले. यावेळी तालुक्यातील विविध शाळांचे विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Students should become a scientist and develop the country - Maya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.