महाविद्यालये सुरू हाेण्याची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 05:50 PM2020-11-28T17:50:09+5:302020-11-28T17:50:25+5:30

कोरोनाची वाढती स्थिती पाहता महाविद्यालये थेट नव्या वर्षातच सुरू होण्याची शक्यता आहे.

Students waiting for colleges to start | महाविद्यालये सुरू हाेण्याची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा 

महाविद्यालये सुरू हाेण्याची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव :  इयत्ता नववी ते बारावीच्या शाळांना प्रारंभ झाल्यामुळे साहजिकच आता महाविद्यालयेही सुरू होतील का, याबाबत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. परंतु, सध्याची कोरोनाची वाढती स्थिती पाहता महाविद्यालये थेट नव्या वर्षातच सुरू होण्याची शक्यता आहे. खुद्द अनेक प्राचार्य आणि प्राध्यापकही तुर्त विद्यार्थ्यांना एकत्र करण्याच्या मताचे नाहीत.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न असलेली अनेक महाविद्यालये जिल्ह्यात आहेत. त्यात बीए, बीकॉम, बीएससी, एमए, एमकॉम, एमएससी अशा पदवी व पदव्यूत्तर अभ्यासक्रमांचा समावेश आहे. तसेच अभियांत्रिकी व अन्य फॅकल्टींचाही समावेश आहे. विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयांनी आॅनलाईन शिकवणी सुरू केली आहे. मात्र विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालय सुरू होण्याची उत्सुकता खेड्यातील विद्यार्थिनींची दुहेरी अडचण महाविद्यालयांचे प्रत्यक्ष वर्ग सुरू नसल्याने प्राध्यापक मंडळी आॅनलाईन पद्धतीने शिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र जिल्ह्यातील अनेक महाविद्यालये तालुका पातळीवर किंवा तालुक्यातील एखाद्या मोठ्या खेडेगावातही आहेत. तेथे शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांना मोबाइल कनेक्टिव्हीटीचा मोठा सामना करावा लागत आहे. आॅनलाईन शिक्षणातून ग्रामीण विद्यार्थिनीच्या शिक्षणाला दुहेरी फटका बसत आहे. अनेक विद्याथीर्ही आता महाविद्यालय सुरू करण्याची मागणी करीत आहेत. ग्रामीण विद्यार्थ्यांना अत्यल्प वेळ मिळत आहे. आॅनलाईन शिकविताना ग्रामीण भागातील ७० टक्के विद्यार्थी कनेक्ट होत नाही. या विद्यार्थ्यांच्या कन्सेप्ट क्लियर करताना अडचणी जातील. अर्धे सत्र संपूनही महाविद्यालय सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्था आहे. 

विद्याथी सकारात्मक तर प्राचार्यांना आदेशाची प्रतीक्षा
महाविद्यालये सुरू क रण्याकरिता विद्याथी सकारात्मक आहेत. एका र्षाचा प्रश्न असल्याने महाविद्यालये लवकर सुरू व्हावे, असे त्यांना वाटते. दुसरीकडे प्राचार्य मात्र विद्यापीठाच्या आदेशाची प्रतीक्षा करीत आहेत. 

 १ सप्टेंबरपासून आॅनलाईन अभ्यासक्रम सुरू आहे. महाविद्यालय सुरू करण्याबाबत सध्या तरी विद्यापीठाच्या गाइडलाइन आलेल्या नाहीत. शासन जेव्हा आदेश देईल, तेव्हा महाविद्यालय सुरू करण्यात येईल.
- प्राचार्य निलीमा देशमुख , प्राचार्य, शिंगणे महाविद्यालय, खामगाव. 


  यावर्षी कोरोनामुळे  मार्च महिन्यापासून महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे एक वर्षांचे नुकसान होणार आहे. हे नुकसान टाळण्याकरिता महाविद्यालय सुरू व्हायला पाहीजे. 
- पंकज लांजूळकर
विद्यार्थी, अभियांत्रिकी महाविद्यालय, शेगाव. 

Web Title: Students waiting for colleges to start

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.