विद्यार्थ्यांना मिळणार डेंग्यूचे डास ओळखण्याचे प्रशिक्षण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 12:49 AM2017-09-18T00:49:26+5:302017-09-18T00:49:41+5:30
सर्वत्र संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी नदी, नाले व पाण्याचे डबके साचल्याने त्यामध्ये मोठय़ा प्रमाणात डासांची निर्मिती होऊन अनेक रुग्ण तापेने फणफणत आहे त. त्यामुळे आपला परिसर डेंग्यू डासमुक्त राहण्यासाठी विद्यार्थ्यांना डेंग्यू डास ओळखण्याची माहिती जिल्हा हिवताप कार्यालयाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.
हर्षनंदन वाघ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : सर्वत्र संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी नदी, नाले व पाण्याचे डबके साचल्याने त्यामध्ये मोठय़ा प्रमाणात डासांची निर्मिती होऊन अनेक रुग्ण तापेने फणफणत आहे त. त्यामुळे आपला परिसर डेंग्यू डासमुक्त राहण्यासाठी विद्यार्थ्यांना डेंग्यू डास ओळखण्याची माहिती जिल्हा हिवताप कार्यालयाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.
जिल्ह्यात यावर्षी मागील आठ दिवसांपासून संततधार पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचून दुर्गंधी वाढली आहे. त्यामुळे डासांची मोठय़ा प्रमाणात उत्पत्ती झाली. त्यामुळे ग्रामीण भागासह शहर परिसरात तापेचे रुग्ण वाढले असून, जिल्हा सामान्य रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालयात तापेच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यात डेंग्यूचा रुग्ण असल्याचा संशय व्यक्त होत आहे. या पृष्ठभूमीवर राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा हिवताप कार्यालयाच्यावतीने जिल्हा हिवताप अधिकारी एस.बी. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली डेंग्यू डास ओळखण्यासाठी माहिती प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत बुलडाण्यात ५ सप्टेंबर रोजी आरोग्य सहायक, ७ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेमध्ये आरोग्य सहायिका, तसेच १५ सप्टेंबर रोजी वैद्यकीय अधिकार्यांची कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत डेंग्यू डास कसा ओळखावा, डेंग्यू डासाची उत्पत्ती होऊ नये म्हणून करावयाची उपाययोजना तसेच आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याबाबत नागरिकांना कशा प्रकारे माहिती द्यावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
रोहणा व खामगाव येथे आज शिक्षकांची कार्यशाळा
विद्यार्थ्यांनी डेंग्यूचा डास ओळखून आपला परिसरात स्वच्छ व भयमुक्त कसा करावा, याबाबत त्यांचे शिक्षक चांगले मार्गदर्शन करू शकतात. यासाठी प्रथम डेंग्यू डासाबाबत शिक्षकांना माहिती देण्यासाठी १८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता रोहणा व २ वाजता खामगाव येथे जिल्हा परिषद शिक्षकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत जिल्हा हिवताप अधिकारी एस.बी. चव्हाण मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेनंतर शिक्षक आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना डेंग्यू डास ओळखण्याची माहिती देणार आहेत.