फरार तलाठय़ाची न्यायालयापुढे शरणागती!
By Admin | Published: June 22, 2017 04:30 AM2017-06-22T04:30:59+5:302017-06-22T04:30:59+5:30
बनावट अकृषक प्रकरणी २८ जूनपर्यंंंत पोलीस कोठडी.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : चिखली भाग १ शिवारातील २ हेक्टर ४२ आर शेतजमिनीच्या बनावट अकृषक आदेशाद्वारे फेरफार व इतर दस्तावेज रूजू केल्याप्रकरणी गेल्या वर्षभरापासून फरार असलेल्या तलाठी रियाज शेख याने १९ जून रोजी जिल्हा सत्र न्यायालयासमोर शरणागती पत्करली असून, न्यायालयाने तलाठी शेख यास २८ जूनपर्यंंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.
याबाबत सविस्तर असे की, तांबुळवाडी येथील गणेश सखाराम गंडे यांची चिखली भाग १ शिवारातील २ हेक्टर ४२ आर जमीन आहे. याबाबत २ एप्रिल २0१२ रोजी तलाठी रियाज शेखने गंडेंची भेट घेऊन माझे व तत्कालीन एसडीओ निकोसे यांचे घनिष्ठ संबंध असल्याची बतावणी करीत सदरची जमीन अकृषक करून देतो, यासाठी ३0 हजार रुपये शासकीय चलन भरण्यासाठी द्यावे लागतील, तसेच या कामासाठी पत्नीच्या नावाने सदर जमिनीतील प्लॉट क्रमांक २ ज्याचे एकूण क्षेत्रफळ १0२0 चौ.फूट याची पोकळ खरेदी खत करून द्यावी लागेल, अशी मागणी केली होती. त्यानुसार गंडे यांनी दुसर्या दिवशी ३0 हजार रुपये शिवाजी लक्ष्मण साखरे यांच्या समक्ष दिले होते.