पिण्याच्या पाण्यासाठी २१ सप्टेंबरपर्यंत मागणी सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:42 AM2021-09-09T04:42:10+5:302021-09-09T04:42:10+5:30

बुलडाणा : जिल्हा पाणी आरक्षण समितीची सभा पालकमंत्री तथा अध्यक्ष जिल्हा पाणी आरक्षण समिती, तसेच समितीचे सदस्य सचिव तथा ...

Submit demand for drinking water by 21st September | पिण्याच्या पाण्यासाठी २१ सप्टेंबरपर्यंत मागणी सादर करा

पिण्याच्या पाण्यासाठी २१ सप्टेंबरपर्यंत मागणी सादर करा

googlenewsNext

बुलडाणा : जिल्हा पाणी आरक्षण समितीची सभा पालकमंत्री तथा अध्यक्ष जिल्हा पाणी आरक्षण समिती, तसेच समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत ५ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर २०२१ दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. त्यानुसार बुलडाणा पाटबंधारे विभागाकडील प्रकल्पांवरून पिण्याचे पाणी आरक्षणाची मागणी नोंदविण्यात येत आहे. सर्व नगर परिषदा यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडील, पंचायत समिती / संबंधित ग्रामपंचायत यांनी कार्यकारी अभियंता, बुलडाणा पाटबंधारे विभाग, बुलडाणा यांच्याकडे २१ सप्टेंबर २०२१ पूर्वी सादर करण्याचे आवाहन केले आहे.

जिल्हा पाणी आरक्षण समितीच्या सभेमध्ये ही मागणी सादर करण्यात येणार आहे. या सभेमध्ये प्रकल्पांमधील उपलब्ध पाणीसाठ्यानुसार पिण्याच्या पाण्याच्या आरक्षणास मंजुरी देण्यात येणार आहे. याची सर्व संबंधित बिगरसिंचन आरक्षण करणाऱ्या संस्थांनी नोंद घ्यावी. प्रतीक्षा न करता पाणी मागणी तत्काळ सादर करावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता, बुलडाणा पाटबंधारे विभाग यांनी केले आहे.

Web Title: Submit demand for drinking water by 21st September

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.