सुबोध सावजींनी उपोषण मंडपात घातले अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट प्रवृत्तीचे श्राद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 06:48 PM2018-04-18T18:48:55+5:302018-04-18T18:48:55+5:30
बुलडाणा : भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट प्रवृत्तीचे अक्षय तृतीयेला पिंडदान श्राद्ध घालून माजी मंत्री सुबोध सावजी यांनी प्रशासनाचा नाकर्तेपणा जनतेसमोर मांडला. जिल्हाभरातील नागरिकांच्या साक्षीने हे अनोखे आंदोलन करण्यात आले.
बुलडाणा : भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट प्रवृत्तीचे अक्षय तृतीयेला पिंडदान श्राद्ध घालून माजी मंत्री सुबोध सावजी यांनी प्रशासनाचा नाकर्तेपणा जनतेसमोर मांडला. जिल्हाभरातील नागरिकांच्या साक्षीने हे अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. बुलडाणा जिल्हा शासकीय नळपाणी पुरवठा योजना भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे अध्यक्ष माजी मंत्री सुबोध सावजी यांचे ११ एप्रिलपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषण सुरु आहे. जिल्ह्यातील शासकीय नळपाणी पुुरवठा योजनेत मोठा भ्रष्टाचार झाला असून त्यासाठी जबाबदार अधिकाºयांविरुद्ध गुन्हा दाखल करा, प्रत्येक गावाला दररोज शुद्ध पाणी मिळावे यासह विविध १३ मागण्यांसाठी त्यांनी उपोषण मांडले आहे. या उपोषणाला राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा व जिल्ह्यातील नागरिकांचा पाठींबा मिळत आहे. मात्र शासनाकडून अद्यापही मागण्या मान्य करण्यात आल्या नाही. मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटणार नसल्याची भूमिका सावजी यांनी घेतली आहे. बुधवारी आंदोलनाच्या आठव्या दिवशी उपोषण मंडपात भ्रष्टाचारी अधिकाºयांच्या भ्रष्ट प्रवृत्तीचे पिंडदान श्राद्ध घालण्यात आले. सुरुवातीला केशदान करण्यात आले. त्यांनतर विधीवत पूजा करुन पिंडदान श्राद्ध घालण्यात आले. यामाध्यमातून अधिकाºयांना सदबुध्दी मिळावी, अशी अपेक्षा सावजी यांनी यावेळी व्यक्त केली. पुर्वजांच्या समाधानासाठी अक्षय तृतीयेला पिंडदान श्राद्ध घालण्याची प्रथा आहे. त्याअनुषंगाने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी जि. प. माजी अध्यक्षा वर्षा वनारे, मेहकरचे नगरसेवक अलियार खान, संजय ढाकरगे, काँग्रेसचे शहराध्यक्ष कलीम खान, युनूस पटेल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
साक्षीला दोन गणेश
अक्षय तृतीयेला सुबोध सावजी यांनी भ्रष्टाचारी अधिकाºयांच्या भ्रष्ट प्रवृत्तीचे पिंडदान श्राद्ध घातले. यावेळी त्यांनी केशदान केले असून केसकर्तन गणेश जाधव यांनी केले. तर पिंडदानाची विधिवत पूजा गणेश जोशी यांनी केली. श्राद्ध घालताना साक्षीला दोन गणेश असल्यामुळे या आंदोलनाला गणेश पावणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
उद्या मटकी फोड आंदोलन
अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर भ्रष्टाचारी अधिकाºयांचे श्राद्ध घातल्यानंतर आता १९ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मटकी फोड आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्ह्याभरातील महिला मटकी फोडून आपला रोष व्यक्त करण्यात आहेत. स्वच्छ पाणीपुरवठा व्हावा, पाणी समस्या कायमची सुटावी व पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचार करणाºयांवर कारवाई व्हावी या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.