सुबोध सावजींनी आरोग्य प्रशासनाला धरले धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 06:44 PM2018-05-05T18:44:35+5:302018-05-05T18:44:35+5:30

बुलडाणा : जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अधिनस्त असलेल्या जिल्ह्यातील सहा आरोग्य उपकेंद्रांच्या इमारती एक वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून बंद असल्याच्या मुद्द्यावरुन माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी ५ मे रोजी आरोग्य प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.

Subodhashi Savji took the Health Administration | सुबोध सावजींनी आरोग्य प्रशासनाला धरले धारेवर

सुबोध सावजींनी आरोग्य प्रशासनाला धरले धारेवर

Next
ठळक मुद्दे. माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी जिल्ह्यातील आरोग्य उपकेंद्रांना भेटी देऊन तेथील परिस्थिती जाणून घेतली.सहा आरोग्य उपकेंद्रांच्या इमारती एका वर्षापेक्षा जास्त काळापासून बंद असल्याचे वास्तव समोर आले.शनिवारी सावजी यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांची भेट घेतली,या सहा आरोग्य उपकेंद्रांबद्दल त्यांना जाब विचारला.


बुलडाणा : जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अधिनस्त असलेल्या जिल्ह्यातील सहा आरोग्य उपकेंद्रांच्या इमारती एक वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून बंद असल्याच्या मुद्द्यावरुन माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी ५ मे रोजी आरोग्य प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. याप्रकरणी चौकशीचे आदेश निर्गमित करण्यासह १५ दिवसांच्या आत कारवाई करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आरोग्य अधिकाºयांच्या कक्षात मांडलेले ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.  
बुलडाणा जिल्ह्यात २८० आरोग्य उपकेंद्र आहेत. या उपकेंद्राच्या माध्यमातून ग्रामिण भागातील गोरगरिब रुग्णांवर औषधोपचार करण्यात येतात. शासनाचा दरवर्षी लाखो रुपयांचा निधी या उपकेंद्रांवर खर्च होतो. मात्र तरीही रुग्णांना योग्य औषधोपचार मिळत नाहीत. त्यामुळे रुग्णांना गैरसोय सहन करावी लागते. माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी जिल्ह्यातील आरोग्य उपकेंद्रांना भेटी देऊन तेथील परिस्थिती जाणून घेतली. तेव्हा अनेक गंभीर बाबी समोर आल्या. जळगाव जामोद तालुक्यातील भिंगारा, झाडेगाव, आडोळ, लोणार तालुक्यातील अजिसपूर, चोरपांग्रा व संग्रामपूर तालुक्यातील कळमखेड आदी सहा आरोग्य उपकेंद्रांच्या इमारती एका वर्षापेक्षा जास्त काळापासून बंद असल्याचे वास्तव समोर आले. शनिवारी सावजी यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांची भेट घेतली. बंद असलेल्या या सहा आरोग्य उपकेंद्रांबद्दल त्यांना जाब विचारला. मात्र त्यांना याविषयी काहीच माहित नसल्याची बाब  समोर आली. ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय कक्षातून हलणार नसल्याची भूमिका सावजी यांनी घेतली. दरम्यान संबंधित वैद्यकिय अधिकारी, गटविकास अधिकारी यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन सुबोध सावजी यांच्या समक्ष चौकशी करण्याचे आदेश निर्गमित करण्यात येतील. ही कारवाई १५ दिवसात करण्यात येईल, असे लेखी आश्वासन डॉ. पवार यांनी दिले.

Web Title: Subodhashi Savji took the Health Administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.