मोफत चारा बियाण्यासाठी अनुदान केवळ १५ लाख रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 02:17 PM2019-12-17T14:17:09+5:302019-12-17T14:17:14+5:30
२५ लाख रुपये अनुदानाची मागणी केली असता जिल्ह्याला केवळ १५ लाख रुपये अनुदान प्राप्त झाले आहे.
- ब्रम्हानंद जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: गतवर्षी चारा पिकासाठी गाळपेर योजना राबविण्यात आली होती; मात्र यंदा अतिपावसाने गाळपेरासाठी क्षेत्रच शिल्लक राहिले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सोईनुसार चाºयाची लागवड केली जाणार आहे. सध्या चारा बियाणे मोफत वाटप करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी २५ लाख रुपये अनुदानाची मागणी केली असता जिल्ह्याला केवळ १५ लाख रुपये अनुदान प्राप्त झाले आहे.
जिल्ह्यात १० लाखाच्या घरात पशुधनाची संख्या आहे. दरवर्षी मार्च-एप्रिल पर्यंत चारा पुरतो. परंतू मे ते जूनदरम्यान चारा छावण्या किंवा इतर प्रकारे चाºयाचे नियोजन करण्यात येते. गतवर्षी जलसंपदा, मृदा व जलसंधारण विभागाच्या प्रकल्पांमध्ये पाणीसाठा कमी होता. त्यामुळे धरण किंवा प्रकल्पाच्या मोकळ्या झालेल्या जमिनी चारा पिकांच्या लागवडीकरिता उपयुक्त ठरल्या. पेरणीसाठी सरकारकडून शेतकऱ्यांना बियाणे व खते मोफत देण्यात आले. गाळपेरा जमिनीवर ज्वारी, बाजरी, मका या पिकांचे उत्पादन अनेक शेतकºयांनी घेतले. या पिकातून निर्माण होणारा चाºयाचा फायदा जनावरांना झाला. परंतू यंदा जिल्ह्यात परतीचा पाऊस जास्त झाल्याने गाळ पेरा होऊ शकत नाही. सर्वत्र धरण व इतर छोटे-प्रकल्प तुंडूब आहेत. त्यामुळे गाळपेरा ऐवजी यंदा शेतकºयांच्या सोईनुसार चाºयाची लागवड करण्यात येणार आहे. अतिपावसाने चाºयाचे मोठे नुकसान झालेले आहे.
आतापासून चाºयाची टंचाई भेडसावत असल्याने पशुपालक चिंताग्रस्त आहेत. जिल्हा परिषदच्या पशुसंवर्धन विभागाकडून चारा नियोजनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शेतकºयांना मोफत चारा बियाण्याचे वाटप करण्यासाठी २५ लाख रुपयांची मागणी जिल्हा परिषद विभागाकडून शासनाकडे करण्यात आली होती. त्यासाठी १५ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. या अनुदानातून लवकरच शेतकºयांचा चारा बियाणे वाटप होणार आहे.
पाच हजार किलो बियाण्याचे होणार वाटप
१० गुंठे शेतजमीनीमध्ये एक किलो चारा बियाण्याची लागवड करण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्ह्यात जवळपास पाच हजार किलो चारा बियाण्यांचे वाटप केले जाणार आहे. त्यानुसार जिल्हा परिषद पशुधन विभागाकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
असा मिळणार शेतकºयांना लाभ
चारा लागवडीसाठी योग्य शेतजमीनी उपलब्ध असणे महत्त्वाचे आहे. चारा बियाण्याचा लाभ घेण्याकरीता शेतकºयांना केवळ एक अर्ज व सातबारा आवश्यक आहे. हा अर्ज आणि सातबारा आपल्या गावाला असलेले पशुवैद्यकीय अधिकाºयांकडे द्यावा लागणार आहे. त्यानंतर शेतकºयास चारा बियाणे वाटप होईल.
महाबिजकडे बियाण्याची मागणी
चारा पिकासाठी जिल्हा परिषदकडे ६० टक्के अनुदान प्राप्त झाले आहे. त्यातून जिल्ह्याला लागणाºया चारा बियाण्याची मागणी महाबिजकडे करण्यात आली आहे. महाबिजकडून बियाणे उपलब्ध होताच लाभार्थी शेतकºयांना बियाण्याचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.