प्रशासकीय समन्वयातून बुलडाणा पॅटर्नला यश - व्ही. डी. पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2020 06:56 PM2020-10-24T18:56:22+5:302020-10-24T18:58:55+5:30
Buldhana News बुलडाणा जलसंधारण पॅटर्न पर्यावरण संवर्धनासाठीही उपयुक्त.
Next
ल ोकमत न्यूज नेटवर्कजलसंवर्धनाच्या बुलडाणा पॅटर्नची निती आयोगाने दखल घेतल्याच्या पार्श्वभूमीवर २०१६ पासून या उपक्रमामध्ये समन्वयक म्हणून काम करत असलेले सार्वजनिक बांधकाम विभागातील (राष्ट्रीय महामार्ग) व्ही. डी. पाटील यांच्याशी या पॅटर्नच्या यशाबाबत साधलेला संवाद. बुलडाणा पॅटर्नच्या यशाचे गमक काय?तीन यंत्रणांचा समन्वय व सकारात्मक दृष्टीकोण हे बुलडाणा पॅटर्नच्या यशाचे गमक म्हणावे लागले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातील अधिकारी, जिल्हाधिकारी आणि जलसंपदा विभागातील तीन अधिकाऱ्यांच्या समन्वयावर बुलडाणा पॅटर्नचे यश अवलंबून आहे. बुलडाणा जिल्ह्यात ते छानपणे झाल्याने त्याचे दृष्यपरिणाम समोर येत आहे. उपक्रमासाठी कसे जोडल्या गेलात?सेवानिवृत्त झालो होता. राष्ट्रीय महामार्गाची कामे सुरू होती. त्यात बुलडाणा जिल्ह्यातील कामे सुरू करण्यात आली असता स्व. भाऊसाहेब फुंडकर यांनी हा मुद्दा उचलून धरला होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी पाठबळ दिले व पुढे त्यांच्या सुचनांनुसार काम करत गेलो. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे समन्वयक बाळासाहेब ठेंग यांचेही सहकार्य यात मिळाले. जिल्हाधिकारीस्तरावर उपक्रमाचे नियोजन व्हावे?देशपातळीवर यानुषंगाने आता निती आयोगाच्या माध्यमातून धोरण ठरत आहे. त्यासंदर्भाने जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत याचे नियोजन झाल्यास या उपक्रमाची व्याप्ती वाढून त्याला मोठे यश मिळेल. तलाव शोधण्यासाठी काय प्रयत्न केले?मुरूमासाठी तलवा शोधण्याचे महत्त्वाचे काम आहे. जिल्ह्यात रेकॉर्डवर नसलेले व जुन्या काळात कामे झालेले काही तलाव आहेत. त्याचा शोध घेणे महत्त्वाचे आहे. त्यामध्ये आपण बरेच काम केले. तीन्ही यंत्रणात समन्वय ठेवण्यास प्राधान्य दिले. अन्यत्रही असा समन्वय राखल्या गेल्यास या पॅटर्नद्वारे मोठे यश मिळेल. जुने तलाव शोधून माथा ते पायथा अशा पद्धतीने काम करण्यास प्राधान्य दिले. मोठ्या वाहनाद्वारे मुरूम उचलून रस्ता कामाच्या ठिकाणापर्यंत आणणे जिकरीचे आहे. त्यासाठी शेतकरी, दुर्गम भागातील रस्ता व स्थानिकांचे सहकार्य घेण्यास प्राधान्य दिल्याने उपक्रम यशस्वी झाला. जलसंधारणाच्या बुलडाणा पॅटर्नची राष्ट्रीयस्तरावर दखल घेण्यात आली आहे. निती आयोग सध्या त्यावर काम करत आहे. भुजल पातळी वाढण्यास या पॅटर्नमुळे मदत मिळून राज्य शासनाच्या पैशांची बचतही होण्यास मदत झाली.- व्ही. डी. पाटील