श्रुतिका बावस्करचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:26 AM2021-06-06T04:26:18+5:302021-06-06T04:26:18+5:30
अनुराधा अभियांत्रिकीने शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक, व्यक्तिमत्त्व विकास आदींमध्ये नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित हा लौकिक प्राप्त केला असून या महाविद्यालयाचे ५०० ...
अनुराधा अभियांत्रिकीने शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक, व्यक्तिमत्त्व विकास आदींमध्ये नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित हा लौकिक प्राप्त केला असून या महाविद्यालयाचे ५०० पेक्षा अधिक विद्यार्थी विदेशात, तर देशभरात सुमारे चार हजार विद्यार्थी नामांकित पदावर कार्यरत आहेत. काही विद्यार्थ्यांनी स्वत:चे उद्योग उभारून अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यात श्रृतिकाच्या निवडीने महाविद्यालयाची मान उंचावली असून ही गौरवाची बाब असल्याचे मत यानिमित्ताने परमहंस रामकृष्ण मौनीबाबा शिक्षण संस्थेचे सचिव माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी निमित्ताने व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष सिद्धविनायक बोंद्रे, उपाध्यक्ष डॉ. व्ही. आर. यादव, विश्वस्त नानासाहेब सराफ, सलीमोद्दीन काझी, सिद्धेश्वर वानेरे, आत्माराम देशमाने, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण नन्हई, तसेच सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी या निवडीबद्दल समाधान व्यक्त केले आहे.