सुनेने सासर्‍याचा अंगठा तोडला; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 02:06 AM2018-02-21T02:06:06+5:302018-02-21T02:11:05+5:30

देऊळगावराजा : सासरा आणि सून यांच्यात झालेल्या भांडणात सुनेने सासर्‍याच्या हाताचा अंगठा दाताने तोडून टाकल्याचा प्रकार देऊळगावराजा शहरात घडला. याप्रकरणी फिर्यादीनुसार सून व अन्य एक अशा दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर याच प्रकरणात सुनेच्या तक्रारीवरून सासर्‍याविरुद्ध गुन्हा नोंद झालेला आहे. 

Suddenly broke the throat of your brother-in-law; Filed the complaint | सुनेने सासर्‍याचा अंगठा तोडला; गुन्हा दाखल

सुनेने सासर्‍याचा अंगठा तोडला; गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देदेऊळगावराजा शहरातील घटनासून व अन्य एक अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
देऊळगावराजा : सासरा आणि सून यांच्यात झालेल्या भांडणात सुनेने सासर्‍याच्या हाताचा अंगठा दाताने तोडून टाकल्याचा प्रकार देऊळगावराजा शहरात घडला. याप्रकरणी फिर्यादीनुसार सून व अन्य एक अशा दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर याच प्रकरणात सुनेच्या तक्रारीवरून सासर्‍याविरुद्ध गुन्हा नोंद झालेला आहे. 
देऊळगावराजा पोलिसांना प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार, यादव भागोजी मुंडे (वय ७0, रा.सावंगी टेकाळे) आणि त्यांची सून अश्‍विनी ज्ञानेश्‍वर मुंडे (रा. देऊळगावराजा) यांच्यात १५ फेब्रुवारी २0१८ रोजी देऊळगाव राजामध्ये एका क्लिनिकसमोर भांडण झाले होते. सुनेने सासर्‍याच्या विरोधात तक्रार दिल्याने यादव यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. 
पण त्याच भांडणात रागाच्या भरात सून अश्‍विनी मुंडे हिने दाताने सासर्‍याच्या डाव्या हाताचा अंगठा जोराने चावून तुकडा पाडला होता. प्राथमिक उपचारानंतर त्यांना जालना येथे दाखल करण्यात आले; मात्र तुटलेल्या अंगठय़ात माती मिसळल्याने व रक्तस्त्राव झाल्याने अंगठा परत बोटाला जोङणे शक्य झाले नाही. 
प्रकरणी सदर बाजार जालना पोलीस स्टेशनचे हेडकॉन्स्टेबल एस. डी. बोराटे यांनी संबंधितांचे बयाण नोंदविले. विनायक राघोजी मुंडे यांनी  देऊळगाव राजा पोलीस ठाण्याला तक्रार दिली आहे. जालना पोलिसांकडून प्राप्त झालेले बयाण व विनायक मुंडेंच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सून अश्‍विनी ज्ञानेश्‍वर मुंडे व अन्य एका अशा दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ठाणेदार सारंग नवलकार यांच्या  मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल सर्जेराव तौर घटनेचा पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Suddenly broke the throat of your brother-in-law; Filed the complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.