अवकाळी पावसाचा वीटभट्टय़ांना फटका

By admin | Published: April 16, 2015 01:10 AM2015-04-16T01:10:06+5:302015-04-16T01:10:06+5:30

अवकाळी पावसामुळे वीटभट्टय़ांची मोठी हानी; विटांची कमतरताही जाणवण्याची शक्यता.

Suddenly the rain hits the gutters | अवकाळी पावसाचा वीटभट्टय़ांना फटका

अवकाळी पावसाचा वीटभट्टय़ांना फटका

Next

जळगाव जामोद (जि. बुलडाणा): तालुक्यात सतत तीन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे वीटभट्टय़ांची मोठी हानी झाली आहे. त्यामुळे भविष्यात विटांच्या भावात वाढ होऊन विटांची कमतरताही जाणवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जळगाव जामोद तालुक्यात पूर्णा नदीच्या काठावर वसलेल्या मानेगाव व झाडेगाव येथे वीटभट्टय़ांची संख्या मोठी आहे. या भट्टय़ांची वीट ही उत्तम असल्याने अकोला व बुलडाणा जिल्ह्यात अनेक गावांमध्ये व शहरात येथील वीट उत् पादनाला मोठी मागणी असते; परंतु यावर्षी जानेवारी, फेब्रुवारी व मार्च या तीन महिन्यांत अधूनमधून अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने वीट उत्पादकांची मोठी हानी झाली. त्यातून सावरत एप्रिल महिन्यात मोठय़ा प्रमाणावर कच्ची वीट तयार करण्यात आली; परंतु ही वीट पक्की होण्यापूर्वीच १0, ११ व १२ एप्रिलला तालुक्यात प्रचंड अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे या भागातील सुमारे २५ वीट उत्पादकांनी तयार केलेल्या लाखो कच्च्या विटांची अक्षरश: माती झाली. काहींनी चट्टे तयार केले होते. त्यांचीही माती झाल्याने वीट उत्पादकांवर अक्षरश: आभाळ कोसळल्याचेच दिसून येत आहे. त्यामुळे सर्व वीट उत्पादक अत्यंत हवालदिल झाले आहे. झालेली हानी कशी भरून काढावी, हा त्यांच्यापुढे मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाच्या लेखी, हा व्यवसाय नुकसान भरपाईसाठी पात्र नसल्याचे समजते. वीट उत् पादनासाठी जी परवानगी आवश्यक असते, ती अनेक उत्पादकांकडे नाही. कारण प्रदूषणाच्या पृष्ठभूमीवर शासकीय अटी अत्यंत जाचक असल्याने रीतसर परवानगी मिळणे फार कठीण जाते. या व्यवसायाला पावसाचा जो फटका बसला, त्याकरिता शासनाने आर्थिक मदत करावी, अशी वीट उत्पादकांची मागणी आहे.

Web Title: Suddenly the rain hits the gutters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.