आठवडी बाजाराला जागा पुरेना

By admin | Published: December 29, 2014 12:10 AM2014-12-29T00:10:00+5:302014-12-29T00:10:00+5:30

बुलडाणा नगर परिषद आणि पाणीपुरवठा विभागाच्या इमारतीही बाजाराच्या विळख्यात.

Sufficient space for Weekend Market | आठवडी बाजाराला जागा पुरेना

आठवडी बाजाराला जागा पुरेना

Next

बुलडाणा : शहरातील मेन रोड व लगतच्या प्रमुख रस्त्यावर आठवडी बाजाराचे प्रस्थ वाढू लागले आहे. त्यामुळे आठवडी बाजाराच्या रविवारी या परिसरात तुंडुंब गर्दी होऊन वाहतूक ठप्प होते. जागे आभावी बाजारातील दुकान नगर परिषद आणि जि.प.पाणीपुरवठा विभागाच्या आवारात लावले जात आहे. पोलिसांना वाढती वाहतूक व गर्दीवरील नियंत्रण सर्वस्वी अशक्य होते. आठवडी बाजाराच्या अरुंद रस्ते व वाढत्या गदीमुळे एखादे वेळी चेंगराचेंगरीची शक्यता निर्माण झाली असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे. या पार्श्‍वभूमीवर येथील आठवडी बाजाराचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याची गरज निर्माण झाली आहे.
या शहराचा आठवडी बाजार हा मलकापूर-चिखली या मेन रोडवर भरतो. पूर्वी लोकसंख्येच्या तुलनेत आता आठवडी बाजाराची जागा कमी पडू लागल्याने स्टेट बँक चौक ते मेन रोड, मलकापूर रोड, सिनेमा टॉकीज, नगर परिषद आवार अशा अनेक ठिकाणी हा बाजार पसरला आहे. आठवडी बाजाराच्या दिवशी शहरातील या रस्त्याच्या मधोमध व दुर्तफा अनेक लहान मोठय़ा व्यावसायिकांनी दुकाने थाटल्यामुळे स्थायी दुकानदारांची परवड होत आहे. वाहतुकीच्या हमरस्त्यावर मधोमध दुकाने लावण्यासाठी या दिवशी प्रचंड स्पर्धा व चढाओढ असते.
दुकानदार व बाजार करण्यासाठी आलेले ग्राहक यांच्या तुडूंब गर्दीमुळे आठवडी बाजाराला जत्रेचे स्वरूप येते. त्यामुळे आठवडी बाजारातून चालणेही कठीण होते. वाहतुकीचा देखील प्रश्न निर्माण होतो. येथे बर्‍यावेळा लहानसहान अपघाताच्या घटनाही घडल्या आहे.
काही वर्षांपूर्वी नगर परिषदेने आठवडी बाजार अन्यत्र हलविण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या, मात्र त्यासाठी आवश्यक त्या जागेचा प्रश्न निर्माण झाला होता. बुलढाण्याच्या आठवडी बाजाराचे अन्यत्र पुनर्वसन करण्याची आवश्यकता आहे.
शहर पोलीस ठाण्याने हा आठवडी बाजार अन्यत्र सुरक्षित ठिकाणी भरवावा, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक व नगर प्रशासनास पाठविला होता. मात्र हा प्रस्ताव पुढे हवेत विरली

Web Title: Sufficient space for Weekend Market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.