बँकेतील महिलांची होणारी दमछाक थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:39 AM2021-08-12T04:39:18+5:302021-08-12T04:39:18+5:30

लोणार : प्रधानमंत्री मातृ वंदन योजनेच्या लाभार्थी महिला पोस्ट पेमेंट बॅंकेला पसंती देत आहेत. इतर बॅंकांमध्ये खाते ...

The suffocation of the women in the bank stopped | बँकेतील महिलांची होणारी दमछाक थांबली

बँकेतील महिलांची होणारी दमछाक थांबली

Next

लोणार : प्रधानमंत्री मातृ वंदन योजनेच्या लाभार्थी महिला पोस्ट पेमेंट बॅंकेला पसंती देत आहेत. इतर बॅंकांमध्ये खाते उघडण्यासाठी बराच अवधी लागत असल्याने पाेस्ट पेमेंट बॅंक सुलभ ठरत आहे़

केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी अनेक योजना आहेत. त्यासाठी नॅशनल बँकेचे बचत खाते अनुदान घेण्यासाठी आवश्यक असते. लोणार येथील भारतीय स्टेट बँक या ठिकाणी व्यापारी, ग्राहकांचे शेतकरी कर्ज योजना तसेच इतर शासकीय विभागातील शासकीय योजनेच्या कामाचा व्याप पाहता दिवसेंदिवस या बँकेमध्ये खात्यांची संख्या वाढत आहे. बचत खाते आधार लिंक करण्यासाठी व इतर सर्व कामांसाठी महिलांना त्रास होत होता. या बँकेमध्ये खाते उघडण्याकरिता कालावधी लागत होता. भारतीय स्टेट बँकेमध्ये गर्दी होत असल्याने महिलावर्ग या बँकेत जाण्यासाठी टाळाटाळ करतात. परंतु इंडिया पोस्ट पेमेंट बँक या ठिकाणी पाच ते दहा मिनिटांमध्ये खाते उघडता येते. त्यामुळे महिलांची भारतीय स्टेट बँकेत होणारी पायपीट थांबली आहे. गर्भवती महिलांना प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचे शासकीय अनुदान दिले जात आहे. यासाठी बँकेचे बचत खाते आवश्यक असल्यामुळे त्यांना अनुदानासाठी उशीर लागत होता. परंतु आता पोस्ट ऑफिसमध्ये तत्काळ गर्भवती महिलांना या ठिकाणी बचत खाते उघडता येत आहे. त्यामुळे महिलांना अनुदान मिळविण्यासाठी वेळ लागत नाही. हे खाते उघडण्याकरिता जास्त पैशाची गरज नाही.

खाते उघडण्यासाठी राबवावे शिबिर

शहरी भागातील महिलांना अंगणवाडी केंद्रावर व ग्रामीण रुग्णालय येथे पोस्ट विभागाअंतर्गत शिबिर घेऊन या गरोदर महिलांचे खाते उघडण्याची गरज आहे. असे शिबिर घेतल्यास गर्भवतींना दिलासा मिळणार आहे़

090821\3158img_20210803_135614.jpg

लोणार येथे पोस्ट बँकेचे फोटो..

Web Title: The suffocation of the women in the bank stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.