कोविड नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजनांच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:36 AM2021-04-09T04:36:32+5:302021-04-09T04:36:32+5:30

जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग वाढतच आहे. वाढत्या रूग्णसंख्या व अनुषंगिक बाबींविषयी आढावा घेण्यासाठी दोन सदस्यीय केंद्रीय पथक ८ एप्रिल ...

Suggestions for effective measures for covid control | कोविड नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजनांच्या सूचना

कोविड नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजनांच्या सूचना

Next

जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग वाढतच आहे. वाढत्या रूग्णसंख्या व अनुषंगिक बाबींविषयी आढावा घेण्यासाठी दोन सदस्यीय केंद्रीय पथक ८ एप्रिल रोजी जिल्ह्यात दाखल झाले. कोरोना संसर्ग परिस्थितीचा आढावा केंद्रीय पथकाने घेतला. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात दोन सदस्यीय केंद्रीय पथकाने बैठक घेतली. बैठकीला केंद्रीय पथकातील राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र नवी दिल्लीचे उपसंचालक डॉ. नवीन वर्मा, भुवनेश्वर आयुर्विज्ञान संस्थान मधील भूलतज्ज्ञ आंतर वैद्यकीय विभागातील सहा. प्राध्यापक डॉ. दृष्टी सुंदरदास, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे, अति. आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे आदी उपस्थित होते. त्यानंतर पथकाने जिल्हा परिषदेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे यांच्या कक्षात पुन्हा तालुकानिहाय कोरोना संसर्ग व उपाययोजनांचा आढावा घेतला. बैठकीत केंद्रीय पथकातील सदस्यांनी जिल्ह्यातील कोविड संसर्ग परिस्थिती, कोरोना मृत्यू दर, पॉझिटिव्हिटी दर, दररोज होत असलेल्या तपासण्या, कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग आदींची माहिती घेतली. कोविड नियंत्रणासाठी आवश्यक त्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. त्याचप्रमाणे पथकातील सदस्यांनी कोविड लसीकरणाची माहिती घेतली. दररोज होणारे लसीकरण आदींची माहिती घेतली. लसीकरण सेंटर, तेथे असणाऱ्या सुविधा, कोविड रूग्णालयांमधील बेड, ऑक्सिजन बेड, आयसीयू युनीट, व्हेंटिलेटर आदींचा आढावाही पथकाने घेतला. कोरोना संसर्ग सुरक्षा नियमांचे पालन, सामाजिक अंतर नियम, मास्क लावणे, गर्दी टाळणे आदी नियमांच्या अंमलबजावणीसुद्धा माहिती पथकाने घेत आढावा घेतला.

लसीकरण व काेविड केअर सेंटरची पाहणी

या केंद्रीय पथकाला जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी जिल्ह्यातील कोरोना संसर्ग परिस्थितीची माहिती दिली. बैठकीनंतर तालुक्यातील लसीकरण केंद्र, कोविड केअर सेंटर व शासकीय रूग्णालयांना पथकाने भेटी दिल्या. यावेळी त्यांच्या समावेत आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

चार दिवस पथक जिल्ह्यात

केंद्रीय पथक चार दिवस जिल्ह्यात राहणार आहे. जिल्ह्यात प्रत्यक्ष फिरून हे पथक एकंदरीत स्थितीचा आढावाही घेणार आहे. दरम्यान, पथक स्वत:च निर्णय घेऊन नेमक्या कोणत्या ठिकाणी भेटी द्यावयाच्या आहेत हे निश्चित करेल. त्यामुळे जिल्ह्यातील स्थानिक अधिकाऱ्यांच्या या केंद्राच्या दोन सदस्यीय पथकाच्या दौऱ्यामध्ये फारसा हस्तक्षेप राहणार नसल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.

Web Title: Suggestions for effective measures for covid control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.