दारुबंदी विरोधात आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Published: August 25, 2015 02:03 AM2015-08-25T02:03:44+5:302015-08-25T02:03:44+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील बिबी येथील विषारी औषध प्राशन करुन महिलांनी आत्महत्येचा प्रयत्न; पोलीसांच्या सर्तकतेने अर्नथ टळला.

Suicide attempt against alcoholism | दारुबंदी विरोधात आत्महत्येचा प्रयत्न

दारुबंदी विरोधात आत्महत्येचा प्रयत्न

Next

बिबी (जि. बुलडाणा) : गेल्या एक वर्षापासून बिबी येथे दारुबंदी विरोधात महिलांनी आंदोलन करुनही दारुबंदी होत नसल्याने २४ ऑगस्ट रोजी येथील देशी दारुच्या दुकानासमोर विषारी औषध प्राशन करुन महिलांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांच्या सतर्कतेने हा प्रयत्न असफल झाला. बिबी येथील सुनिता श्रीकिसन भांड या महिलेने ३ मार्च २0१३ ला दारुबंदी विरोधात प्रयत्न सुरु केला होता. दरम्यान, सुनिता भांड, लता सखाराम धाईत, जिजा भगवान सदावर्ते यांच्यासह शेकडो महिलांनी आंदोलने सुरू केली. त्यानंतर ९ फेब्रुवारी २0१५ ला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. २८ जून रोजी दारुबंदीसंदर्भात ग्रामसभा घेऊन तसा ठराव जिल्हाधिकार्‍यांना सादर करण्यात आला; परंतु दारुबंदी होतच नसल्याने २४ ऑगस्ट रोजी आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा महिलांनी दिला होता. दरम्यान, शेकडो महिलांनी दुपारी २ वाजतापासून दारुबंदी विरोधात घोषणा देत येथील देशी दारुच्या दुकानासमोर धरणे आंदोलन केले. उपविभागीय पोलीस अधिकारी सुहेल शर्मा, उपविभागीय अधिकारी डॉ.नीलेश अपार यांनी आंदोलनकर्त्या महिलांची चर्चा करून पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे आश्‍वासन दिल्यावर आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक किशोर कांबळे, उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक किरण पाटील, टी.जी.लव्हाळे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Suicide attempt against alcoholism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.