मलकापूर तहसील कार्यालयात महिला कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 01:15 PM2019-11-16T13:15:27+5:302019-11-16T13:15:38+5:30

महिला कर्मचाºयाने उंदीर मारण्याचे औषध खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना १५ नोव्हेंबर रोजी दुपारी मलकापूर तहसील कार्यालयात घडली.

Suicide attempt by a female employee at a Malkapur tahsil office | मलकापूर तहसील कार्यालयात महिला कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

मलकापूर तहसील कार्यालयात महिला कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

googlenewsNext

मलकापूर : तहसील कार्यालयात कार्यरत एका ३५ वर्षीय महिला कर्मचाºयाने उंदीर मारण्याचे औषध खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना १५ नोव्हेंबर रोजी दुपारी मलकापूर तहसील कार्यालयात घडली.
तहसील कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन विभागात कनिष्ठ लिपिक या पदावर कार्यरत अलका चव्हाण (३५) या महिला कर्मचाºयाला तब्येत बिघडल्याने सहकारी महिला कर्मचाऱ्यांनी तातडीने खासगी रुग्णालयात उपचारार्थ भरती केले होते. उपविभागीय अधिकारी सुनील विंचनकर यांनी दखल घेत महिलेच्या प्रकृतीची विचारपूस केली. तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे, निवासी नायब तहसीलदार गजानन राजगडे, नायब तहसीलदार प्रवीण घोटकर आदींनी तात्काळ रुग्णालयाकडे धाव घेत डॉक्टरांशी चर्चा करीत परिस्थिती जाणून घेतली त्याचप्रमाणे तात्काळ योग्य ते उपचार करावे अशा सूचना सुद्धा दिल्या. मात्र महिला कर्मचाºयांची परिस्थिती पाहता डॉ. झंवर यांनी या रुग्णाला जळगाव खान्देश कडे हलविण्याचा सल्ला दिला.

 


या प्रकाराची सखोल चौकशी करण्यात येईल. तूर्त त्या महिला कर्मचारी च्या प्रकृतीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. त्या लवकर बºया व्हाव्यात यासाठी मदतीवर आमचा भर आहे.
-सुनील विंचनकर
उपविभागीय अधिकारी मलकापूर.

घटना कळताच आम्ही रुग्णालयात दाखल होत त्या महिला कर्मचाºयावर तातडीने उपचार करण्यासंदर्भात डॉक्टरांना सूचित केले. एक महिला कर्मचारी म्हणून त्यांची विशेष काळजी घेतली जाईल.
- स्वप्नाली डोईफोडे. तहसीलदार.


कार्यालयीन शिस्तीमध्ये कर्मचाºयांकडून काम करून घेणे हे आमचे कर्तव्य असून त्या कर्तव्याचा भाग म्हणून आम्ही कर्मचाºयांशी वागतो. कुणाबद्दल आकस बुद्धी ठेवून आम्ही काम करीत नाही.
-गजानन राजगडे निवासी नायब तहसीलदार.

 

 

Web Title: Suicide attempt by a female employee at a Malkapur tahsil office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.