पोलीस ठाण्यातच महिला आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 12:40 AM2017-09-27T00:40:09+5:302017-09-27T00:43:30+5:30
खामगाव (बुलडाणा) : अवैध सावकारीप्रकरणी अटकेत असलेल्या महिला आरोपीने शहर पोलिस स्टेशनमध्ये मच्छर मारण्याचे द्रव्य प्राषन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना २६ सप्टेंबर रोजी रात्री १0 वाजताच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क

व्याजाची रक्कम अदा केल्यानंतरही सावकाराकडून केल्या जाणार्या अवास्तव पैशांसह सावकाराच्या जाचाला कंटाळून एकाच कुटुंबातील तिघांनी सोमवारी आत्महत्येचा प्रयत्न केला. तिघांपैकी एकाचा मृत्यू झाला तर दोघांची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी सोनल प्रकाश गावंडे, विजय रामचंद्र कबाडे या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना मंगळवरी न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने २९ स प्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान मंगळवारी रात्री पोलीस ठाण्यातच सोनल गावंडेने मच्छर मारण्याकरीता असलेले द्रव्य प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. सोनल यांनी विषारी द्रव्य प्राशन केल्याचे लक्षात येताच ठाण्यात एकच गोंधळ उडाला. सोनलला तत्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरु असल्याची माहीती सुत्रांनी दिली.