शेतकऱ्याची विष प्राशन करुन आत्महत्या

By admin | Published: May 30, 2017 01:06 AM2017-05-30T01:06:53+5:302017-05-30T01:06:53+5:30

खामगाव : शेगाव तालुक्यातील पाळोदी येथील तरुण शेतकऱ्याने कर्ज व नापिकीला कंटाळून आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना २७ मे रोजी घडली.

Suicide by farming poisoning | शेतकऱ्याची विष प्राशन करुन आत्महत्या

शेतकऱ्याची विष प्राशन करुन आत्महत्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : शेगाव तालुक्यातील पाळोदी येथील तरुण शेतकऱ्याने कर्ज व नापिकीला कंटाळून आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना २७ मे रोजी घडली.
पाळोदी येथील शेतकरी प्रल्हाद बाळकृष्ण भारसाकळे (वय २७) याने २७ मे रोजी विष प्राशन करुन जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. सदर प्रकार प्रल्हाद भारसाकळे यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अत्यवस्थ झालेल्या प्रल्हाद भारसाकळे यांना तातडीने उपचारासाठी शेगाव येथील सईबाई मोटे रुग्णालयात दाखल केले; मात्र प्रकृती अत्यवस्थ असल्याने प्रल्हाद भारसाकळे यांच्यावर प्रथमोपचार करुन त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले; मात्र अकोला येथील रुग्णालयात नेण्यापूर्वीच प्रल्हाद भारसाकळे यांची प्राणज्योत मालवली. सदर मृत शेतकऱ्यावर सेंट्रल बँक आॅफ इंडियाचे १ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज थकीत आहे. मृताच्या पश्चात आई-वडील, बहीण, भाऊ असा आप्त परिवार आहे.

Web Title: Suicide by farming poisoning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.