खुमगाव येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची मालगाडीच्या इंजिनसमोर येऊन आत्महत्या

By विवेक चांदुरकर | Published: March 9, 2024 06:37 PM2024-03-09T18:37:00+5:302024-03-09T18:37:14+5:30

मृतदेह शवविच्छेदनाकरीता रुग्णवाहिकेने सरकारी दवाखाना नांदुरा येथे आणण्यात आला.

Suicide of a debt-ridden farmer in Khumgaon | खुमगाव येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची मालगाडीच्या इंजिनसमोर येऊन आत्महत्या

खुमगाव येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची मालगाडीच्या इंजिनसमोर येऊन आत्महत्या

नांदुराः तालुक्यातील खुमगाव येथे एक कर्जबाजारी शेतकऱ्याने मालगाडीच्या इंजिनसमोर येऊन आत्महत्या केल्याची घटना ९ मार्च रोजी उघडकीस आली. खुमगाव बुर्ती स्टेशन मास्टर यांनी शेगाव येथील लोहमार्ग पोलीस अंमलदार गजानन मेटांगे यांना इसमाने आत्महत्या केल्याची माहिती दिली. मुकेश शंकरराव काळे (वय ४६ वर्षे) यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याचे नातेवाइकांनी सांगितले.

मृतदेह शवविच्छेदनाकरीता रुग्णवाहिकेने सरकारी दवाखाना नांदुरा येथे आणण्यात आला. मुकेश हा घरातील कर्ता पुरुष असून त्याचे मागे पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. मुकेश शेतकरी असून कर्जबाजारी होता. त्याच नैराश्यातुन त्याने आपले जीवन संपविले असल्याचे नातेवाइकांनी सांगितले. पुढील तपास लोहमार्ग पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार पांडुरंग वसू करीत आहे. कारवाइदरम्यान पोलिसांना रेल्वे सुरक्षा बलचे हवालदार झनके, खुमगाव येथील माजी सरपंच रोहित सोनोने, गजानन वावगे, किशोर गई, बाबुराव काळे यांनी मदत केली. लोहमार्ग पोलीस स्टेशन शेगाव येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Suicide of a debt-ridden farmer in Khumgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.